Chandra Grahan 2022 Sakal
संस्कृती

Chandra Grahan 2022 : आज चंद्रग्रहण; वेध काळात चुकूनही करू नका 'ही' कामं

वर्षातील दुसरे चंद्रग्रहण उद्या म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Chandra Grahan 2022 : वर्षातील दुसरे चंद्रग्रहण उद्या म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण संध्याकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ते ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत असणार आहे. चंद्रग्रहणाचा वेधकाळ ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सुरू होणार आहे. सकाळी ९ वाजून २१ मिनिटांनी वेध काळ सुरू होणार आहे.

संपूर्ण चंद्रग्रहण केवळ भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये दिसणार आहे, उर्वरित भागात आंशिक चंद्रग्रहण दिसेल. आज आम्ही चंद्रग्रहणापूर्वी लागणाऱ्या वेध काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्श करणार आहोत.

वेध काळात करावे आणि काय करू नये

  • वेध काळात शक्य तितके कमी बोलावे. याकाळात शक्य तितके भगवंताचे नाव घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही देवाचे ध्यान करणे, पूजा करणे आदी गोष्टी करू शकता.

  • वेध काळात ग्रहणाशी संबंधित ग्रहाच्या शांतीसाठी पूजा, पठण आणि मंत्रांचा जप केल्यानेही फायदा होतो.

  • वेध काळात योगा आणि ध्यान करण्यावर भर द्या. यामुळे तुमची मानसिक शक्ती विकसित होण्याबरोबरच ग्रहणाच्या दुष्परिणामांपासून स्वतःचे रक्षण करू होण्यास मदत होईल.

  • वेध काळात काळात अन्न शिजवू नका. जर तुम्ही आधीच अन्न शिजवले असेल तर, त्यामध्ये तुळशीची पाने टाका.

  • चंद्रग्रहणाच्या वेळी कुटुंबाने चंद्र मंत्रांचा जप करावा.

  • वेध काळ संपल्यावर घराची स्वच्छता करून स्नान करून देवाची पूजा करावी.

  • ग्रहण संपल्यानंतर घरात आणि देवघरात गंगाजल शिंपडून घराची शुद्धता करावी.

  • वेध काळात गरोदर महिलांनी घराबाहेर जाऊ नये.

  • शास्त्रानुसार, वेध काळात दात स्वच्छ करणे आणि केसं विंचरणे टाळावे. तसेच या काळात झोपणे टाळावे.

  • वेध काळात कोणत्याही पवित्र मूर्तीला स्पर्श करणे अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे अस करणे टाळा. वेध काळात मनामध्ये नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. वेध काळात शक्यतो चाकू, कात्री यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करणे टाळावे.

चंद्रग्रहण काळात कार या मंत्राचा जप

चंद्रग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्र किंवा प्रमुख देवतेच्या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. त्याशिवाय ग्रहणानंतर शिवलिंगाला "ओम नमः शिवाय" या मंत्राचा जप करत जल अर्पण करावे. यामुळे चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम कमी होण्यास मदत आहे. ग्रहण काळात “ओम क्षीरपुत्रय विद्महे अमृत तत्ववे धीमह तन्नो चंद्र: प्रचोदयात” या मंत्राचा जप करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT