Chapati Shastra Esakal
संस्कृती

Chapati Shastra: पहिली पोळी गायीसाठी तर शेवटची कुत्र्यासाठीच का करावी?

मान्यतेनुसार, गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे.

सकाळ डिजिटल टीम

पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे. मात्र, गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांना माहित आहे की हिंदू धर्मात गाईला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार, गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे. ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी -देवतांनाही आहार देत आहात. 

हिंदू धर्मात गायीला माता ही म्हटलं जातं. प्राचीन काळापासून गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजाही केली जाते. गायीची पूजा आणि सेवा केल्यानं पुण्य मिळतं. गायीला सर्व देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते. अशा स्थितीत गाईला भाकरी खाऊ घातल्यानं सर्व देवी-देवता प्रसन्न होतात.सगळ्यात आधी देवी-देवतांना नैवेद्य दिला जातो. त्यामुळे गाईसाठी पहिली पोळी असते आणि असं केल्यानं सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

● पहिली पोळी गायीला आणि शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी करावी ही एक परंपरा आहे जी शतकानुशतके चालत आलेली आहे. आजच्या लेखात आपण पहिली पोळी गायीसाठी तर शेवटची कुत्र्यासाठीच का करावी याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

● घरात अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होते आणि घरातील सदस्यांमध्ये रात्रंदिवस भांडणं होत असतात. कुटुंबात सुख-शांती नसेल तर सकाळी सर्वप्रथम केलेली भाकरी गायीला आणि शेवटची भाकरी कुत्र्याला खाऊ घालावी. यामुळे मतभेद आणि भांडणाची समस्या संपते.

● ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि किंवा राहू-केतू अशुभ असेल तर घरी बनवलेली शेवटची पोळी ही कुत्र्याला खाऊ घालावी. यामुळे सर्व प्रकारच्या दोषांचा प्रभाव कमी होतो. मान्यतेनुसार कुत्रा ही कालभैरवाची स्वारी मानली जाते आणि कुत्र्याला खाऊ घातल्यास कालभैरव प्रसन्न होतो. त्यामुळे तुमच्यावर अपघाती मृत्यूचा धोका नाही.

● पितरांच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्यास फायदा होतो. कुत्र्याला रोज पोळी खायला दिल्यास तुमचे नशीब उजळते, म्हणून कुत्र्याला रोज खायला द्या.

● रोज सकाळ-संध्याकाळ काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की कुत्रा आपल्या मालकावर येणारी संकटे घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारचा भूतबाधा होत नाही.

● सकाळी घरी बनवलेल्या पहिल्या पोळीचे चार तुकडे करावेत. पहिला तुकडा गाईसाठी, दुसरा तुकडा कुत्र्यासाठी, तिसरा तुकडा कावळ्यासाठी आणि चौथा तुकडा कोणत्याही चौकात ठेवा. असं केल्यानं पैसे मिळू लागतात आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सच्या गळाला मोठा मासा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगला मारली 'लाथ'

Ashok Kharat मी पहिल्यांदाच हे ऐकतोय! खरात कोर्टात काय बोलला? मंदिरातही कधीतरी जायचो, तिथे...

कोल्हापुरात पंपांवर रांगा! जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं पॅनिक बायिंग न करण्याचं आवाहन, म्हणाले, पुरेसा इंधन साठा

Recharge New Rules : मंथली प्लॅनच्या नावाखाली लूट थांबणार? वर्षात महिने १२ पण रिचार्ज १३; कंपन्यांना सरकारचा इशारा, ग्राहकांना होणार फायदा

Latest Marathi News Live Update : खरातप्रकरणी तपासामध्ये काही प्राण्यांचे अवयव मिळून आले- पीडितेचे वकील

SCROLL FOR NEXT