panchang google
संस्कृती

Panchang 4 August 2022:पिवळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ *डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ४ ॲागस्ट २०२२ (daily marathi Panchang 4 August 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* श्रावण १३ शके १९४४

आज सूर्योदय ०६:१५ वाजता तर सूर्यास्त १९:०५ वाजता होणार. चंद्रोदयाची वेळ ही ११:३८ वाजता तर प्रात: संध्याची वेळ स.०५:०८ ते स.०६:१५ दरम्यान असणार. सायं संध्या ही  १९:०५ ते २०:१२ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा १३:५८ ते १६:३२ दरम्यान असणार. प्रदोषकाळ हा १९:०५ ते २१:२० दरम्यान असणार आहे तरनिशीथ काळ हा २४:१९ ते २५:०३दरम्यान असणार आहे.

आज राहु काळ हा १४:१७ ते १५:५२ दरम्यान आहे तर यमघंट काळ हा ०६:१७ ते ०७:५३ दरम्यान असणार. आज श्राद्धतिथी ही सप्तमी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी आवळा खावू नये.या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त -१२:४१ ते १४:१७

  • अमृत मुहूर्त -१४:१७ ते १५:५२

  • विजय मुहूर्त -१४:५० ते १५:४३

पृथ्वीवर अग्निवास नाही. बुध मुखात आहुती आहे. शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - सप्तमी(२४:२८ प.नं.अष्टमी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - चित्रा(१५:३९ प.नं.स्वाती)

  • योग - साध्य(१४:३६ प.नं.शुभ)

  • करण - गरज(१३:०० प.नं. वणिज)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा २४:२८ नं., श्री सूर्य जयंती, बुधबृहस्पती पूजन, सूर्यास कापसाचे पोवते वाहणे, संत तुलसीदास जयंती, रवियोग १५:३९ प. या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे. दत्त कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. दत्तगुरुंना केळ्यांचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी. दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT