Daily Panchang Sakal
संस्कृती

Panchang 22nd sept: गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१५ ते दु.०१:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २२ सप्टेंबर २०२२

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २२ सप्टेंबर २०२२ (Daily panchang 22 september 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ३१ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२६ वाजता तर सूर्यास्त १८:२८ वाजता आहे. आज चंद्रोदय २८:०० वाजता होणार. आज प्रात: संध्या ही स.०५:१५ ते स.०६:२६ दरम्यान होणार. आज सायं संध्या ही  १८:२८ ते १९:४० दरम्यान होणार तर अपराण्हकाळ हा १३:४० ते १६:०४ दरम्यान होणार. आज प्रदोषकाळ हा १८:२८ ते २०:५२ दरम्यान होणार. आज निशीथ काळ २४:०४ ते २४:५२ दरम्यान होणार. आज राहु काळ हा १३:५७ ते १५:२७ दरम्यान होणार. आज यमघंट काळ हा ०६:२७ ते ०७:५७ दरम्यान होणार.

आज श्राद्धतिथी ही द्वादशी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१५ ते दु.०१:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मसूर खावू नये. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - १२:२७ ते १३:५७

  • अमृत मुहूर्त -  १३:५७ ते १५:२७

  • विजय मुहूर्त - १४:२८ ते १५:१६

पृथ्वीवर अग्निवास नाही. केतु मुखात आहुती आहे. शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - द्वादशी(२४:११ प.नं. त्रयोदशी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - आश्लेषा(२६:१६ प.नं.मघा)

  • योग - शिव(११:०२ प.नं.सिद्ध)

  • करण - कौलव(११:१८ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - कर्क (२६:१६ नं.सिंह)

  • सूर्य रास - कन्या

  • गुरु रास - मीन

विशेष:- द्वादशी श्राद्ध, संन्यासी-यती-वैष्णव यांचे महालय श्राद्ध

या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे. दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशिंना रात्री ०२:१६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT