Daily Panchang Sakal
संस्कृती

Panchang 27th Oct : आज पिवळे वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:११ ते दु.०३:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ५ शके १९४४

आज सूर्योदय ०६:३६ वाजता तर सूर्यास्त १८:०१ वाजता होणार. आज चंद्रोदय ०८:११ वाजता होणार तर प्रात: संध्या ही स.०५:२१ ते स.०६:३६ दरम्यान होणार. आज सायं संध्या ही  १८:०१ ते १९:१६ दरम्यान होणार तर अपराण्हकाळ हा १३:२७ ते १५:४४ दरम्यान होणार.

आज प्रदोषकाळ १८:०१ ते २०:३२ दरम्यान होणार तर निशीथ काळ हा २३:५३ ते २४:४४ दरम्यान होणार तर राहु काळ हा १३:४४ ते १५:१० दरम्यान होणार. आज यमघंट काळ हा ०६:३६ ते ०८:०१ दरम्यान होणार तर आज श्राद्धतिथी ही तृतीया श्राद्ध आहे. (daily panchang 27 october 2022 )

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:११ ते दु.०३:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तोंडली घेवू नये. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १२:१८ ते १३:४४

  • अमृत मुहूर्त -  १३:४४ ते १५:१०

  • विजय मुहूर्त - १४:१२ ते १४:५८

पृथ्वीवर अग्निवास १३:५४ प. सूर्य मुखात आहुती आहे. शिववास १३:५४ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १३:५४ प.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - कार्तिक

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(१३:५४ प.नं.तृतीया)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - विशाखा(१४:११ प.नं. अनुराधा)

  • योग - आयुष्मान(१०:०९ प.नं.सौभाग्य)

  • करण - कौलव(१३:५४ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - तुळ (०८:२५ नं.वृश्चिक)

  • सूर्य रास - तुळ

  • गुरु रास - मीन

पंचांगकर्ते: सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.पं.गौरव देशपांडे

विशेष:- भाऊबीज, यमद्वितीया, अपराण्हकाळी चित्रगुप्त सहित यमपूजन व यमतर्पण, यमास १४ अर्घ्य देणे, यमुना स्नान, भावाने बहिणीच्या घरी भोजन करणे, मु.रविउस्सानि मासारंभ

या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे. दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे. ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. दत्तगुरुंना केळ्यांचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी

दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुम, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT