Daily Panchang  esakal
संस्कृती

Panchang 28 April : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:२८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २८ एप्रिल २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ८ शके १९४५

आज सूर्योदय ०६:१३ वाजता तर सूर्यास्त १८:५१ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही १२:४४ वाजता होणार. आज प्रात: संध्या ही स.०५:०४ ते स.०६:१३ दरम्यान असणार तर आज सायं संध्या ही  १८:५१ ते १९:५९दरम्यान असणार. आज अपराण्हकाळ हा १३:४७ ते १६:२०दरम्यान असणार.

आज प्रदोषकाळ हा १८:५१ ते २१:०७ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५५ दरम्यान असणार तर राहु काळ हा १०:५७ ते ते १२:३२ दरम्यान असणार. आज यमघंट काळ हा १५:४२ ते १७:१७ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही अष्टमी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:२८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी नारळ खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - ०७:४८ ते ०९:२३

  • अमृत मुहूर्त - ०९:२३ ते १०:५७

  • विजय मुहूर्त - १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर शुक्र मुखात आहुती आहे. शिववास १६:०८ नं.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १६:०८ नं.अनुकूल दिवस आहे. गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - अष्टमी(१६:०८ प.नं. नवमी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - पुष्य(१०:०५ प.नं.आश्लेषा)

  • योग - शूल(०९:५० प.नं. गंड)

  • करण - बव(१६:०८ प.नं.बालव)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मेष

विशेष:- दुर्गाष्टमी, सूर्याचा भरणी नक्षत्र प्रवेश स.०६:३३, आंब्याच्या रसाने देवीपूजा करणे, बगलामुखी जयंती, श्री शंकर महाराज पुण्यतिथी (पुणे)

या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे. देवी अर्गला स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. देवीला खवा बर्फीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️खगोल अभ्यासक व देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; विदर्भात तापमान वाढीचा इशारा

Virat Kohli Tattoo: विराट कोहलीने हातावर गोंदवला 'कमळ'; काय आहे, नवीन टॅटूचा खास अर्थ?

Latest Marathi News Live Update : वसईत ऋषिकेश वैद्यचा शोध सुरू; पुणे पोलिसांची विविध पथके रवाना

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी खुशखबर! महाराष्ट्रात वीजदर १० ते १४% ने कमी होणार; नवे दर कधी लागू करणार?

Pune Baramati Shuttle: पुण्यातून धावली ‘राजमाता जिजाऊ’ शटल; पुणे-बारामती मार्गावरील सेवेला प्रारंभ, महिला सुरक्षेला प्राधान्य!

SCROLL FOR NEXT