Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi sakal
संस्कृती

Panchang 9th sept: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ सप्टेंबर २०२२ (daily panchang 9 september 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १८ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२५ वाजता तर सूर्यास्त १८:३८ वाजता सुरू होणार. आज चंद्रोदय १७:२७ वाजता तर प्रात: संध्या ही स.०५:१४ ते स.०६:२५ दरम्यान सुरू होणार. आज सायं संध्या ही  १८:३८ ते १९:४९ दरम्यान असणार. आज अपराण्हकाळ हा १३:४५ ते १६:११ दरम्यान असणार तर प्रदोषकाळ हा १८:३८ ते २०:५९ दरम्यान असणार. आज निशीथ काळ हा २४:०८ ते २४:५५ दरम्यान असणार तर राहु काळ हा ११:०० ते १२:३२ दरम्यान असणार. आज यमघंट काळ हा १५:३५ ते १७:०७ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही चतुर्दशी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी सायं.०५:२७ प. शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४५ ते दु.०३:२३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मध खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - ०७:५७ ते ०९:२८

  • अमृत मुहूर्त - ०९:२८ ते ११:००

  • विजय मुहूर्त - १४:३४ ते १५:२२

पृथ्वीवर अग्निवास नाही. चंद्र मुखात आहुती आहे. शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - चतुर्दशी(१७:२७ प.नं. पौर्णिमा)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - धनिष्ठा(११:४६ प.नं.शततारका)

  • योग - सुकर्मा(१९:३६ प.नं.धृति)

  • करण - गरज(०६:२९ प.नं. वणिज)

  • चंद्र रास - कुंभ

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १७:२७ ते २८:३१, अनंत चतुर्दशी, कुलधर्मासाठी पौर्णिमा, पंचक नक्षत्र सुरू आहे, रवियोग ११:४६ प.

या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे. देवी कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT