devendra Fadanvis
devendra Fadanvis सकाळ
संस्कृती

80 तासांत CM पद गमावलेल्या फडणवीसांच्या नशिबी पुन्हा सत्तायोग?, काय सांगते पत्रिका

प्राचार्य रमणलाल शहा

देवेंद्र फडणवीस - २२-०७-१९७०, नागपूर

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेत दि. २९/०४/२०२२ रोजी शनी पहिल्या स्थानात आला आहे व दि. १३ एप्रिल २०२२ पासून गुरू दुसऱ्या स्थानात आला आहे. त्यामुळे दि. १३ एप्रिलपासूनच अनुकूलतेला सुरुवात झाली. या दुसऱ्या स्थानातील गुरूची अधिकाराचे जे दहावे स्थान आहे त्याच्यावर सध्या गुरुची दृष्टी आहे. तसेच सहावे जे शत्रूचे स्थान त्याच्यावरही गुरूची दृष्टी आहे.

मूळ पत्रिकेत सहाव्या स्थानात जे रवी, मंगळ बुध आहेत त्यांच्यावरही गुरुची दृष्टी आली आहे. त्यामुळे अधिकाराच्या संदर्भात अनुकूलता निर्माण झाली. आठवे स्थान हे गूढ विद्या, दृष्टांत जे अज्ञात आहे ते ज्ञात होणे याचे आहे. त्याच्यावरही गुरुची दृष्टी आली. त्यामुळे नेमके कोठे काय चालले आहे याची माहिती या गुरूच्या आठव्या स्थानावरील दृष्टीमुळे आली. (Devendra Fadnavis bjp bhavishya patrika prediction )

या बाराव्या स्थानातील गुरूमुळे विरोधकावर मात करता आली व अधिकार प्राप्तीचा मार्ग सुकर झाला. गेल्या राज्यसभेच्या व नंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी जे अलौकीक यश संपादन करता आले त्याचे कारण या दुसऱ्या स्थानातील गुरूचे आहे. सध्या बुध व शुक्र चौथ्या स्थानात आहेत. बुध व शुक्र हे दोन्ही शुभ ग्रह आहेत. त्यांचीही दृष्टी दहाव्या स्थानावर राहणार आहे. सध्या रवी पाचव्या स्थानात आहे. मूळच्या चंद्राबरोबर त्याचा नवपंचम योग झाला आहे. ही सर्व ग्रहस्थिती श्री. देवेंद्र फडणवीस यांना अधिकार प्राप्त करून देण्यासाठी अनुकूल आहे.

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या दोघांनाही महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासूनच प्रतिकूलता होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच जी अंतर्गत धूसफूस होती ती सध्याच्या ग्रहस्थितीमुळे बाहेर आली.

सारांश, शिवसेनेला सध्याची ग्रहस्थिती प्रतिकूल आहे तर भाजपला सद्याची ग्रहस्थिती अनुकूल आहे हे सर्व ज्योतिषशास्त्राच्या शास्त्राप्रमाणे घडत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

SCROLL FOR NEXT