Dhanteras 2022 esakal
संस्कृती

Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला ‘हे’ उपाय करा; नशीब होईल धन-धना-धन

हिंदू धर्मात धनत्रयोदशीला खूप महत्त्व

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वसुबारस म्हणजेच गोवत्स व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटले जाते. हिंदू धर्मात धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे. धनत्रयोदशीचा सण, दिवाळीच्या सणाच्या आधी येतो. यादिवशी माता लक्ष्मीची उपासना करतात. या दिवशी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यास तुम्हाला धन-संपत्ती नक्कीच मिळते. तसेच तुमच्या घरातून गरिबी दूर होते.

या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वहयांची पुजा करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पुजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते. आजच्या दिवशी नव्या कपडयांची आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजल्या जाते. यादिवसाचा आणखी लाभ कसा मिळवायचा ते पाहुयात.

फुटलेली भांडी दान करा

घरातील स्वयंपाकघरात असलेली जुनी तुटलेली,गंजलेली भांडी वापरणे बंद करा. आणि नवीन भांडी खरेदी करा. नवीन भांड्यांच्या रूपात घरात लक्ष्मी येते. जूनी भांडी फेकून न देता ती दान करू शकता. तुमच्या घरात काम करणार्‍या स्त्रीयांना भांडी दिली तर त्यावर शनि प्रसन्न होतो.

हळकुंड तिजोरीत ठेवा

हळकुंडाचा छोटा तुकडा लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावा. हळद शुभ मानली जाते. केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या कमी होऊ लागतात. तिजोरीत हळदीसोबत कापूरच्या ७ वड्या ठेवाव्यात. असे केल्यावरही तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो.

देवीला लवंग वहा

धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवीला पती-पत्नी दोघांनी लवंग अर्पण कराव्यात. लवंग देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. लवंगसोबत वेलची आणि सुपारीही दान करता येते. एवढेच नाही तर धनत्रयोदशीला तुम्ही देवी लक्ष्मीला पानही अर्पण करू शकता.

नाण्यांची पूजा

दिवाळीत खरेदी केलेली सोन्याची किंवा चांदीची नाणी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पूजली जातात. असे केल्याने व्यवसायात यश मिळते. सोने चांदी नसेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी देवीच्या फोटोजवळ पैसे ठेऊन त्याची पूजा करावी.

कुबेराची पूजा

भगवान कुबेरांना धनाची देवता म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत कुबेरजींचीही पूजा करावी. कुबेरजींची पूजा करण्यासाठी कुबेर यंत्र खरेदी करून धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची पूजा करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: १४ किमी सायकल प्रवास ते चेन्नईकडून पदार्पण! शिक्षामित्र असलेल्या बापाच्या लेकाचा IPL प्रवास सुरू, कोण आहे प्रशांत वीर?

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT