diwali fun facts esakal
संस्कृती

Fun Facts : दिवाळी विषयी तुम्हाला 'या' १० गोष्टी माहितीये?

देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण समजला जातो.

सकाळ डिजिटल टीम

Diwali Fun Facts : हिंदूंचा सर्वात मोठा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. दिव्यांचा हा सण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो असं मानलं जातं. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारा हा सण आहे.

पाच दिवसांचे वेगवेगळे महत्व असून खाण्यापासून, कपडे, फटाके अशी सगळ्याच गोष्टींची मजा असते. त्यामुळेच या सणाविषयी काही खास गोष्टी आहेत, त्या आता सांगणार आहोत.

१० फन फॅक्ट्स

  • दिवाळी हा मुख्यत्वे हिंदूंचा सण असला तरी इतर धर्मिय जसे शिख, जैन लोकही हा सण तेवढ्याच उत्साहात साजरा करतात.

  • भारता बाहेर लंडनमध्ये लेइस्टर्स हे असं शहर आहे जिथं सर्वात मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते. ज्यात हजारोने लोकं सहभागी होतात. डान्स, गाणं, लाईट शो अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

  • दिवाळी सण एकच असला तरी साजरा करण्याची कारणं अनेक आहेत. वाईटावर चांगल्याचा विजय, श्रीराम आणि सीता यांचे अयोध्येत आगमन, देवी लक्ष्मी आणि आरोग्याचे देव धन्वंतरी यांचा जन्म दिवस म्हणून दिवाळी साजरी होते.

  • वेगवेगळ्या प्रदेशात दिवाळी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. उदा. नेपाळमध्ये तिहार किंवा स्वांती नावाने साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये काली पूजा म्हटलं जातं. मलेशियाची लोकं हरी दिवाली म्हणून करतात. थायलंडमध्ये लाम क्रियोंघ नावाने साजरा करतात. ते फटाके फोडत नाहीत तर केळीच्या पानांचे दिवे लावतात.

  • प्रसिध्द गोल्डन टेम्पलची स्थापना दिवाळीच्या दिवशी झाली आहे.

  • हिवाळ्याची सुरूवात समजण्याऐवजी बरेच लोक याला नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात समजतात.

  • गुयाना, नेपाळ, फिजी, सिंगापूर, मॉरिशियस, मॅन्मार, श्रीलंका, मलेशिया अशा एकूण ११ देशांमध्ये दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी असते.

  • पहिली दिवाळी अडीच हजार वर्षांपूर्वी साजरी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT