Diwali 2022 Esakal
संस्कृती

Diwali 2022: कोण आहे देवी लक्ष्मीचा भाऊ? त्याच्या शिवाय केलेली पूजा अपूर्ण राहते.

सनातन धर्मात शंख हा लक्ष्मी देवीचा भाऊ मानला जातो. 

सकाळ डिजिटल टीम

आपण अनेकदा पुराणात किंवा घरातल्या मोठ्यांच्या तोंडी हे ऐकलं असेल की दिवाळीच्या रात्री लक्ष्मी देवी आपल्या घरी वास करतात आणि घरातला धन आणि धान्याचा साठा भरतात. 

आपण अनेकदा हे सगळं ऐकलं असणार आहे पण लक्ष्मी देवीचा एक भाऊ पण आहे ज्याच्या शिवाय पूजा केली तर त्याच फळ आपल्याला मिळत नाही. 

कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला दिवाळी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे म्हणतात की दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी आपल्या घरात निवास करते आणि धान्याचे आणि पैशाचे भांडार भरते. 

सनातन धर्मात शंख हा लक्ष्मी देवीचा भाऊ मानला जातो.  यामुळेच देवी लक्ष्मीच्या हातात नेहमी शंख असतो. जशी महालक्ष्मीची पूजा केल्याशिवाय संपत्ती मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे शंखध्वनीशिवाय आध्यात्मिक शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होत नाही. शंख हा विजय, समृद्धी, आनंद, शांती, कीर्ती आणि विक्रमाचे प्रतीक मानले जाते.

शंखाची उत्पत्ती कशी झाली?

माता लक्ष्मीप्रमाणेच शंखाची उत्पत्तीही समुद्रातूनच झाली आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी शंखाची उत्पत्ती झाली. शंख हे 14 रत्नांपैकी एक आहे जे समुद्रमंथनादरम्यान बाहेर पडले. या कारणास्तव देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख या दोघांना भाऊ-बहीण मानले जाते.  शास्त्रात शंख हा लक्ष्मीचा धाकटा भाऊ असल्याचे सांगितले आहे. शंखामध्ये देव-देवता वास करतात असे म्हणतात. शंख हे भगवान विष्णूंचे सर्वात महत्वाचे आणि आवडते वाद्य आहे.

घरात शंख ठेवण्याचे फायदे

● लोकांच्या घरातील देवाऱ्यात शंख ठेवल्याचे तुम्ही बघितले असेल.

● ज्योतिषांच्या मते शंखातून निघणारा आवाज कानावर पडल्यामुळे निरोगी राहण्याचा आशीर्वाद मिळतो.

● वैज्ञानिकदृष्ट्या असेही म्हणतात की पूजेच्या वेळी दररोज शंख वाजवल्याने श्वसनाचे आजार होण्याचा धोका टळतो. 

● याशिवाय शंखध्वनीमुळे घरात सुख-शांती नांदते.

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला घरी शंख आणा.

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी घरामध्ये शुभ वस्तू आणण्याची परंपरा आहे. तुम्ही शंख घरी आणू शकतात. खरतर दक्षिणावर्त शंख हा सर्वोत्तम मानला जातो पण तुम्ही वामावर्ति शंख, गणेश शंख, गायमुखी शंख, कौरी शंख, मोती शंख आणि हिरा शंख देखील घरी आणू शकता.  याशिवाय शिवरात्री आणि नवरात्रीलाही घरात शंख आणण्यासाठी शुभ काळ मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT