Diwali Cleaning Tips esakal
संस्कृती

Diwali Cleaning Tips : यंदाच्या दिवाळीत करा खास 'इकोफ्रेंडली' साफसफाई

दिवाळीत घराची स्वच्छता करण्यासाठी काही इकोफ्रेंडली पद्धती वापरून आपण निसर्गाचीही हानी रोखू शकतो. पाहा काय आहे पर्याय.

सकाळ डिजिटल टीम

Eco-friendly Tricks for Home Cleaning : दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण. या काळात घरातलं दारिद्र्य निघून सुख, शांती, समृध्दी घरात नांदावी म्हणून आपण मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यासाठी सज्ज होत असतो. त्याची सुरूवात घराच्या स्वच्छतेने करतो.

पर्यावरणाच्या जवळ नेणारा हा सण साजरा करताना आपण पर्यावरणापासून दूर जाण्याऐवजी अजून जवळ जाणारा कसा होईल असा विचार व्हायला हवा. त्यासाठीच आम्ही काही इकोफ्रेंडली क्लिनिंग टिप्स दोत आहोत.

घरातील साफसफाई करण्यासाठी आपण रसायनयुक्त क्लीनर आणि प्लॅस्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू वापरतो. मात्र त्याऐवजी घरातील पदार्थ आणि बायोडिग्रीडेबल वस्तू वापरल्यास पर्यावरणाचेही नुकसान होणार नाही.

या पर्यायांचा करा वापर

  • नैसर्गिक क्लीनर :

  1. लिंबूवर्गीय फळाची साल, ब्राऊन शुगर किंवा गूळ, यीस्ट आणि पाणी यांचे मिश्रण बनवा आणि महिनाभर ते तसेच राहू द्या. त्यानंतर ते गाळून स्वच्छतेसाठी वापरू शकता.

  2. स्टीलच्या पृष्ठभागावरील घाण काढण्यासाठी बेकिंग सोड्यामध्ये काही लिंबाचे थेंब मिसळा आणि त्याने स्क्रब करा. रसायन न वापरल्याने निसर्गाचेही नुकसान टळेल आणि तुमच्या हातालाही त्रास होणार नाही.

  • कापडी डस्टर : पेपर टिश्यू किंवा नॅपकिन्स वापरण्याऐवजी कापडाचे डस्टर वापरा. हे दीर्घ काळ टिकेल आणि तुम्हाला वारंवार कागदाचे टिश्यू खरेदी कारवाई लागणार नाहीत.

  • कॉयर स्क्रब : रासायनिक आणि प्लास्टिकने भरलेले सिंथेटिक स्क्रब वापरण्याऐवजी नारळाच्या सालीपासून बनवले गेलेले कॉयर स्क्रब वापरा. हे पर्यावरणास आणि तुमच्या हातांसाठीही अनुकूल आहे.

  • डी-क्लटरिंग : घरातील नको असलेल्या वस्तू काढून टाकणे हा दिवाळीच्या स्वच्छतेतील खूप महत्वाचा भाग आहे. मात्र या वस्तू काढून फेकून देण्यापेक्षा त्या एखाद्या NGO ला द्या. जेणेकरून ते त्याचा योग्य वापर करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT