gods and goddesses in the temple Esakal
संस्कृती

देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो...

आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये देवतांच्या 33 कोटी देव असल्याचे म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात दररोज देवतांची पूजा करण्याचा नियम आहे. अशा परिस्थितीत घर आणि मंदिर या दोन्ही ठिकाणी देवतांचे फोटो किंवा मूर्ती स्थापित केल्यानंतरच पूजा केली जाते. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये देवतांच्या 33 कोटी देव असल्याचे म्हटले आहे. पण मुख्य देवतांमध्ये फक्त आदि पंचदेव येतात, तर त्रिदेवांमध्ये फक्त तीन देव येतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही देवदेवतांची पूजा केली जात नाही किंवा त्यांचे फोटो पूजाघरातही ठेवले जात नाही. चला तर मग आज जाणून घेऊया कोणत्या देवतांचे फोटो किंवा मुर्ती स्थापित केले जात नाही. 

1) भगवान शिवाची नृत्य करणारी मूर्ती म्हणजेच त्यांच्या नटराज मुद्रेची मूर्ती घरात ठेवू नये. असे मानले जाते की भगवान शंकर जेव्हा खूप रागावतात तेव्हाच नाचतात. त्यामुळे भगवान शंकराची तांडव नृत्य करतानाची मूर्ती किंवा फोटो घरी ठेवणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की यामुळे कुटुंबात मतभेद होतात.

2) लक्ष्मी मातेची उभी मूर्ती

लक्ष्मीमातेची मूर्ती किंवा फोटो घरात उभ्या स्थितीत ठेवू नये. माता लक्ष्मी जर तुमच्या घराच्या पूजेच्या ठिकाणी उभ्या स्थितीत असतील, तर मान्यतेनुसार धनाच्या बाबतीत हे अशुभ लक्षण असते. असे मानले जाते की जेव्हा असे होते तेव्हा पैसा तुमच्या हातात राहत नाही.

3) महाकाली देवीची मुर्ती 

महाकाली हे आदिशक्ती पार्वतीचे रूप आहे. राक्षसांचा नाश करण्यासाठी त्यांनी हे रूप धारण केलं. महाकालीचा यांचा राग सहजासहजी शांत होत नाही. घरामध्ये महाकाली किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती रागाच्या मुद्रेत न ठेवण्याचा प्रयत्न करा, हो तुम्ही देवी कालीचे सौम्य मुद्रामध्ये फोटो ठेवू शकता. असे म्हटले जाते की घरात रागात असलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने घरातील सदस्यांना राग येतो आणि भांडणे होतात, त्यामुळे घरात फक्त सौम्य मूर्ती ठेवा.

4) शनिदेवाची मूर्ती 

शनिदेव हे न्यायप्रेमी असल्याचे म्हटले जाते. पण पत्नीनं दिलेल्या शापामुळे त्याची दृष्टी शापित झाली. अशा स्थितीत चुकूनही शनिदेवाच्या डोळ्यात पाहिले तर तुमचे वाईट दिवस सुरू होतील. म्हणूनच त्याच्या चरणांकडे पाहून त्यांना नेहमी नमस्कार करावा. शनिदेवाची मूर्ती पूजनही घरात करू नये. शनिदेवांना घरात ठेवल्याने त्याची दृष्टी आपल्या घरातील सर्व सदस्यांवर पडते, याला शुभ चिन्ह मानले जात नाही. असे केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते असे मानले जाते.

5) राहु किंवा केतूची मुर्ती

तसेच राहु किंवा केतूच्या मूर्तीशी संबंधित ही गोष्ट समजून घ्या, राहु किंवा केतूच्या मूर्तीची

पूजा तेव्हाच करता येते जेव्हा तुम्ही नऊ ग्रहांची पूजा करत असाल. पण त्यांची एकट्यांची पूजा कधीही करू नये. असे केल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

देवघरात या गोष्टींचीही विशेष काळजी घ्यावी.

1) आपल्या घरात कधीच दोन शिवलिंगाची पूजा करू नये.

तसेच घरामध्ये दोन शालिग्रामांची पूजा देखील करू नये.

2) एकाच घरात गणपतीच्या तीन मूर्ती चुकूनही ठेवू नयेत.

3) देवघरात दोन शंख ठेवू नयेत. तसेच दोन सूर्याची मूर्ती ठेवू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT