Family Tips
Family Tips esakal
संस्कृती

Family Tips : आनंदी कौटुंबिक जीवनासाठी हे उपाय नक्की करा

सकाळ डिजिटल टीम

आजच्या काळात पती-पत्नी दोघांनीही नोकरी करणे आवश्यक होते. अशा वेळी कौटुंबिक आयुष्य, सोबत वेळ घलवणे फार कमी झाले आहे. कुटुंब संस्था टिकून राहण्यासाठी चांगली, समाजाला आदर्श कुटुंबिक जीवन जगून दाखवणारी घरे उभी करण्याचा प्रयत्न सुरु झला आहे. म्हणजे आपलं घर छान जिव्हाळ्याचे एकमेकांशी नाते असलेले, गप्पा गोष्टी धमाल मजा करणारे आनंदी ठेवणे हे सुद्धा एक सामाजिक काम ठरणार आहे. कारण समाज हा एकमेकांकडून प्रेरणा घेत असतो मग ती चांगल्या वा वाईट कृतीची असेल.

आपली मुले आपल्याकडून शिकतात. म्हणून आधी आपल्यात बदल करा म्हणजे परंपरा चाली राहिल.

हे उपाय करून बघा

१) रात्रीचे जेवण घरातील सर्वांनी एकत्र बसून टीव्ही मोबाईल बंद ठेवून करावे.

२) रोज संध्याकाळी सर्वांनी एकत्र प्रार्थना, भजन, नामस्मरण करावे.

३) आठवड्यातून एकदा एकतास घरातल्या सर्वांनी एकत्र घालवावा, त्यात बैठे खेळ, वाचन, आठवड्यातील अनुभवाचे sharing, पुढच्या आठवड्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन (planning), कलांचे सादरीकरण, वगैरे सर्वांचा सहभाग असलेले आनंद देणारे कार्यक्रम.

४) निसर्गचक्राशी सुसंगत अशी जीवनशैली म्हणजे रात्री लवकर झोपणे (१० वाजता) व पहाटे ५ वाजता उठणे (circadian rhythm).

५) वर्षातून एकदा सर्वांनी एकत्र देव दर्शन किंवा फिरायला जावे.

६) स्वभाषा शुद्ध बोलणे.. टिकवणे. यासाठी मुलांसोबत वेळ घालवून शिकवावे.

७) स्वभूषा- भारतीय वेश सणाच्या दिवशी तरी वापरणे. भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न करावा.

८) भारतीय भोजन पदार्थ, ऋतू चक्र, त्यानुसार बदल, आरोग्य याबाबत स्वतः समजून घेणे व पुढील पिढीला त्यामागचे शास्त्र (science) सांगणे.

९) रूढी परंपरा म्हणून ज्या गोष्टी असतात त्यामागील शास्त्र समजून मगच करणे, काळानुरूप आता बंद केल्या पाहिजेत अशा रूढी परंपरा बंद करणे.

१०) रोज स्नान, व्यायाम, ध्यान यासाठी आग्रह ठेवणे (स्वतः सुरु करून घरातील इतरांना आग्रह).

११) स्वच्छता कर्मचारी, वर्तमानपत्र दूध वाटप करणारे, भाजी विक्रेते, आदी नियमित आपल्याला भेटणाऱ्यांशी आदराने वागणे, खुशाली विचारपूस करणे, घरातील समारंभ यांचे निमंत्रण देणे.

१२) कुटुंब मित्र बनणे म्हणजे आपल्याला आवडणारी २-४ कुटुंब निश्चित करून सहपरिवार महिन्यातून किमान एकदा त्यांच्या घरी सहज जाणे त्यांना आपल्या घरी बोलावणे, नियमित भेटीतून सुख दुःख वाटता येईल अशी नाती निर्माण करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT