God Live without forgetting Mahamandaleshwar Janardan Hari Ji Maharaj sakal
संस्कृती

देवाला न विसरता संसार करा

महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर : माणसाने सांसारिक जीवन जगताना देवाला न विसरता आपले प्रत्येक कर्म केले तर आपल्याला सुख, शांती, समाधान लाभते, असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी चिनावल येथील मासिक प्रवचन ‘अमृतवाणी’ चे निरूपण करताना केले.

चिनावल येथील नियोजित सतपंथ मंदिरामध्ये आयोजित मासिक प्रवचन कार्यक्रमात पुढे बोलताना सांगितले, की माणसाने विचाराने मनाने श्रीमंत असणे आवश्यक असून वैचारिक श्रीमंतीसह स्वतः साठी वेळ देणे महत्वाचे आहे. गुरुकृपा ही हृदयात भाव जागृत करण्यासाठी असते. सुदामा दरिद्री नव्हते तर ते श्रीमंत होते. कारण त्यांच्या हृदयात परमात्मा होता आणि ते प्रत्येकाच्या हृदयात परमात्म्याचा वास आहे, याची जाणीव करून देत होते.

दररोज आपल्याला जो भेटेल त्याच्याशी चांगले बोला चांगले वागा. आपल्या भावात देव असेल तर तो आपल्याला दगड, माती, लाकूड मध्येही दिसेल व त्याची अनुभूती होईल, असे सांगून क्षणिक ‘मोह’ माणसाला घातक ठरतो. माता सीतेला सुवर्ण मृगाचा मोह झाला आणि पुढे काय घडले आपल्याला माहितीच आहे. महाराजांनी अनेक विविध दाखले दिले.

...तर मंदिराची गरज काय

देव सर्वदूर असताना मंदिराची गरज काय, असा अनेकांचा प्रश्न असतो. त्यावर महाराजांनी सांगितले की, जर आपल्या गाडीचे टायर पंचर झाले तर... हवा सगळीकडे असताना आपल्याला दुकानावर जाण्याची गरज काय, यात आपल्याला उत्तर मिळते. तेथे पंचर जोडण्याचे साहित्य, सर्व टेक्निक म्हणजेच ते पावर स्टेशन आहे. त्याच पद्धतीने मंदिर असते. कोरोना नियमांचे पालन करून सतपंथ मंदिरात काही मोजक्या भाविकांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जगभरातील असंख्य श्रद्धावानांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather : पुण्यात थंडीला सुरुवात; पाच दिवसांत पारा येणार आणखी खाली

Wardha Crime: प्रेमसंबंधास नकार, तरुणीचा आवळला गळा तरुणीचा अन्...

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Balasaheb Thorat: जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनेच: बाळासाहेब थोरात; शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार

Nagpur Crime: कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाचा खून; पारडीतील घटना, चाकूने वार करीत संपविले

SCROLL FOR NEXT