Gold Silver Price Update news esakal
संस्कृती

Raksha Bandhan 2022 | रक्षा बंधनामुळे सोने- चांदीच्या दरात तेजी

आगामी काही दिवसातील रक्षाबंधन, हरतालिका यासह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण बाजारात तेजी येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आगामी काही दिवसातील रक्षाबंधन, हरतालिका यासह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण बाजारात तेजी येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी ५७ हजार रुपये प्रतिकिलो असलेली चांदी शनिवारी (ता. ६) साठ हजारांपर्यंत गेली आहे. तर सोन्याचे दर ५० हजार ७०० प्रतितोळा होते. आज त्यातही १४०० रुपयांची वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

आषाढी एकादशीनंतर लग्नसराई बंद झाल्याने सोने, चांदीला हौसेखातर घेणाऱ्या व्यतिरिक्त मागणी नव्हती. यामुळे सोने, चांदी बाजारात शांतता होती. जुलैत चांदीच्या दरात साडेपाच हजारांची तर सोन्याच्या दरात पाचशे रूपयांची घसरण झाली होती. २२ जूनला चांदीचा दर ६२ हजार ५०० रूपये प्रतिकिलो होता. शनिवारी चांदी ५७ हजार प्रतिकिलो आहे. तर सोन्याचा दर २२ जूनला ५१ हजार होता.

२० जूनला सोन्याचा दर ५० हजार ७०० होता. २२ जुलैला ५९ हजारांचा दर असलेल्या चांदीच्या दरात चक्क दोन हजारांची घसरण होऊन ते ५७ हजार प्रतिकिलोवर स्थिरावत आहेत. यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोने चांदीच्या दरात गुंतवणूक करीत सोने, चांदीची खरेदी केली. रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे फेब्रुवारीत सोने, चांदीच्या दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली होती. यंदाही आषाढी एकादशीनंतर सोने, चांदीच्या दरात घसरण झाली. गेल्या पंधरवड्यात मात्र या दरात वाढ झाल्याने सोने, चांदीला झळाळी येत आहे.

सोने, चांदीचे दर असे (जीएसटी विना)

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

१५ जुलै--५० हजार ७००--५७ हजार

२० जुलै--५० हजार ७००--५७ हजार

२८ जुलै--५१ हजार--५६ हजार

२९ जुलै--५१ हजार ८०० --५९ हजार

३० जुलै--५१ हजार ९००--६० हजार

२ ऑगस्ट--५२ हजार ४००--६० हजार

६ ऑगस्ट--५२ हजार ४००--६० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT