Gudi Padwa 2022 esakal
संस्कृती

Gudi Padwa 2022 : गुढी कशी उभारावी? कसा साजरा करावा गुढीपाडवा

गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

दा. कृ. सोमण

गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

Gudi Padwa 2022 : यंदा शनिवारी म्हणजेच 02 एप्रिल रोजी गुढीपाडवा (Gudi Padwa) सण आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा शालिवाहन शक वर्ष १९४४ शुभकृत् संवत्सराचा प्रारंभ होत आहे. युगाब्द ५१२४ चा प्रारंभ होत आहे. गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

गुढी कशी उभी करावी...

वेळूची ( बांबूची ) एक काठी घेऊन , ती स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे वस्त्र, फुलांची व साखर माळ घालून त्यावर एक लोटी ठेवावी. अशा रितीने तयार केलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून त्यावर उभी करावी. या गुढीस ‘ ब्रह्मध्वज ‘ असे म्हणतात. तिची पूजा करावी.

गुढीपूजन कसे करावे...

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून घराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दरवाजासमोर रांगोळी काढावी. नवीन वस्त्रे परिधान करावी. देवाची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) एक काठी घेऊन , ती स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे वस्त्र, फुलांची व साखर माळ घालून त्यावर एक लोटी ठेवावी. अशा रितीने तयार केलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून त्यावर उभी करावी. या गुढीस ‘ ब्रह्मध्वज ‘ असे म्हणतात. तिची पूजा करावी.

गुढीची पूजा केल्यानंतर कडुनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगले वाटावे आणि सर्वानी थोडे थोडे खावे. वर्षारंभी कडुनिंब खाल्ल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. मात्र कडुनिंबाचे अतिसेवन करू नये. त्यानंतर पंचांगातील वर्षफल वाचावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. समाजकार्य करून गरीबांना मदत करावी. दानधर्म करावा. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती उतरावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात! सीटबेल्ट लावल्याने अनर्थ टळला; सुळेंसह सर्वजण सुरक्षित

Beed Crime: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या घराची झाडाझडती; २०१६ पासूनच्या फाईल्स उघडणार?

'चल, अजून एक विकेट टाकली खिशात...'! जोस बटलरला बाद करताच जाडेजाचा भन्नाट सेलिब्रेशन; ‘इन माय पॉकेट’ सेलिब्रेशनची जोरदार चर्चा

RR vs GT Live : शुभमन गिलचे शतक थोड्यात हुकले, पण साई सुदर्शनसह राजस्थानला चांगलेच झोडले! गुजरात टायटन्सचा धावांचा डोंगर

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

SCROLL FOR NEXT