Gudi Padwa 2023  sakal
संस्कृती

Gudi Padwa 2023 : गुढीच्या पूजेमागील शास्त्र जाणून घ्या

चैत्र प्रतिपदेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठी नववर्षाचा प्रारंभ करणारा सण म्हणजे गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. अनेक वर्षांपासून साजरा केल्या जाणाऱ्या या सणालाही एक शास्त्र आणि परंपरा आहे.

यानिमित्त केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रथेमागेही निश्चित शास्त्रीय कारण आहे. त्याचे निसर्गाशी आणि आपल्या प्रकृतीशी नाते आहे. हेच नाते संतुलन आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील तांबे आणि संचालिका डॉ. मालविका तांबे यांनी सोमवारी (ता. २०) ‘तनिष्का’ व्यासपीठांतर्गत आयोजित कार्यक्रमात उलगडले. त्याचा हा सारांश.

गुढीपाडवा का साजरा करतात?

गुढीपाडवा हा निसर्गाचा वाढदिवस आहे. कारण या विश्वाचा प्रारंभ झाला, तो हा दिवस आहे. ईश्वराने या विश्वाची निर्मिती करण्याचे नक्की केले, तो हा दिवस. त्यामुळे या दिवशी सूर्य, चंद्र, पूर्व दिशा एका जागी येतात. त्यामुळे आपल्या आईचा वाढदिवस जसा साजरा करू, तसा हा साजरा करायचा, असे डॉ. मालविका तांबे यांनी सांगितले.

गुढीच्या पूजेमागील शास्त्र

गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज. हा ब्रह्मध्वज आपले म्हणजे मनुष्याचेच प्रतीक आहे. गुढीसाठी वापरण्यात येणारा बांबू म्हणजे काठी, हे आपल्या मणक्याचे प्रतीक आहे. आपल्या शरीराला ताठ उभे करण्यासाठी जसा मणका गरजेचा असतो,

तसेच गुढी उभारण्यासाठी बांबू महत्त्वाचा असतो. यात असलेले वंशलोचन हे हाडांच्या मजबुतीसाठी अतिशय उपयुक्त असते. शरीर केवळ हाडांसह चांगले दिसणार नाही, तर त्यावर मांस चढवावे लागले. तसेच, बांबूना रेशमी वस्त्रादी गोष्टींनी सजवले जाते. त्यावर मस्तकस्वरूप कलश ठेवला जातो, असे डॉ. सुनील तांबे यांनी सांगितले.

गुढी किती उंच असावी?

अनेक ठिकाणी सांगितले जाते की गुढी शक्य तितकी उंच उभारावी. मात्र ते शब्दशः अर्थाने घेऊ नये. गुढी सहा फूट उंच किंवा फार तर सात ते आठ फूट उंच असावी. कारण प्रत्यक्षातील गुढी नव्हे तर आपल्या कर्तृत्वाची गुढी उंच जावी, असा त्यामागील गर्भितार्थ आहे, असे डॉ. सुनील तांबे यांनी सांगितले.

कडुनिंबाची चटणी आणि श्रीखंड का हवे?

गुढीपाडव्याचा सण साखरेचा हार आणि कडुनिंबाची पाने, अशा दोन विरोधी गोष्टींना एकत्र आणत असतो. त्यानंतर श्रीखंड खायला सांगितले आहे. कडुनिंब हे शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असते.

वर्षाच्या पहिल्या दिवशी ते खाल्ले तर त्याची सवय होऊ शकते, म्हणूनच गुढीपाडव्याच्या सणाला हे कडवट चवीचे कडुनिंब खायला सांगितले आहे. त्यानंतरचे श्रीखंडही प्रकृतीसाठी आवश्यक आहे. कारण गोडदेखील शरीराला हवे असते, असे डॉ. मालविका तांबे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT