Hanuman Chalisa 
संस्कृती

अकबराच्या कारागृहात रचली हनुमान चालीसा, कोण होते रचनाकार?

गोस्वामी तुलसीदासजी हे हनुमान चालिसाचे रचनाकार असून ते रामाचे परम भक्तही होते.

सकाळ डिजिटल टीम

Hanuman Chalisa : एकीकडे राज्यात मशिदींवरील भोंगे 3 मे पर्यंत काढण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानंतरदेखील हे भोंगे काढण्यात आले नाही, तर पाच वेळस नमाज सोबस मशिदींसमोर पाच वेळा हनुमान चालिसाचे पठन केले जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्यासह देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, पौराणिक काळापासून घरोघरी म्हणण्यात येणाऱ्या हनुमान चालिसाचे रचनाकार कोण आहेत आणि त्याचा नेमका अर्थ काय हे आपण आज समजावून घेऊया.

कुणी लिहिली हनुमान चालिसा (Who wrote Hanuman Chalisa and Why)

गोस्वामी तुलसीदासजी हे हनुमान चालिसाचे रचनाकार असून ते रामाचे परम भक्तही होते. त्यांना श्रीराम प्रभुंना भेटण्याची तीव्र इच्छा होती आणि यासाठी केवळ हनुमानच मदत करू शकत होते. त्यामुळे तुलसीदास यांनी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा रचल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये सांगण्यात आले आहे. त्यांनी रामचरित मानसही लिहिले असून, याचे नाव आपल्यापैकी सर्वांनाच परिचित आहे. हनुमान चालिसा हा जगातील सर्वाधिक वाचला जाणारा ग्रंथ मानला जातो. यामध्ये अवधीमध्ये हनुमानाचे गुण आणि कर्तृत्व वर्णन केले आहे. या चालीसामध्ये हे वर्णन चाळीस चौपैंमध्ये दिलेले आहे, म्हणूनच याला चालीसा म्हटले गेले. त्यात 40 श्लोकही आहेत.

अशी आहे दंतकथा (How Tulsidas Ji wrote Hanuman Chalisa?)

तुलसीदास यांनी लेखन हनुमान चालिसाबाबत अनेक दंतकथा आहेत. असे म्हणतात की, गोस्वामी तुलसीदासजींना हनुमान चालिसा लिहिण्याची प्रेरणा मुघल सम्राट अकबराच्या तुरुंगवासातून मिळाली. एकदा मुघल सम्राट अकबराने गोस्वामी तुलसीदासजींना राजदरबारात बोलाविल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर अकबराने आपली ओळख प्रभू श्रीरामाशी करून देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तुलसीदासजी म्हणाले की, भगवान श्रीराम भक्तांनाच दर्शन देतात. हे ऐकून अकबराने तुलसीदासांना तुरुंगात टाकले.

पौराणिक कथेनुसार तुलसीदासजी तुरुंगात असताना अवधी भाषेत हनुमान चालीसा लिहिली. त्याचवेळी फतेहपूर सिक्रीच्या तुरुंगात बरीच माकडे आली. त्यांनी येथे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार सम्राट अकबराने तुलसीदासजींची तुरुंगातून सुटका केली.

असे म्हणतात की, तुलसीदासांनी जेव्हा हनुमान चालिसा पहिल्यांदा वाचली तेव्हा ह ती हनुमानजींनी स्वतः ऐकली होती. तसेच प्रसिद्ध पौराणिक कथेनुसार, तुलसीदासांनी रामचरितमानस म्हणणे संपवल्यानंतर सर्व लोक निघून गेले होते. पण एक वयोवृद्ध व्यक्ती तेथेच बसून होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीच नव्हती तर, स्वतः हनुमान असल्याचे पौराणिक कथांमध्ये सांगितले गेले आहे. (Histrory Of Hanuman Chalisa)

हनुमान चालिसाबद्दल उल्लेखनीय गोष्टी

हनुमान चालिसाची सुरुवात दोन जोड्यांपासून होते ज्यांचा पहिला शब्द 'श्रीगुरु' आहे, ज्यामध्ये श्रींचा संदर्भ सीता मातेशी असून, ज्यांना हनुमानजी गुरु मानतात.हनुमान चालिसाच्या पहिल्या 10 चौपाईमध्ये शक्ती आणि ज्ञानाचे वर्णन करण्यात आले आहे. तर, 11 ते 20 पर्यंतच्या चौपईमध्ये भगवान रामाबद्दल सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये 11 ते 15 मधील चौपईंमध्ये भगवान श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण यांच्यावर आधारित आहे. शेवटच्या चौपाईमध्ये तुलसीदासांनी हनुमानजींच्या कृपेबद्दल सांगितले आहे. हनुमान चालिसाचे इंग्रजी भाषा वगळता भारतातील सर्व भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आले आहे.

(या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती धार्मिक ग्रंथातून संकलित करून तुमच्यापर्यंत पोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती वितरीत करणे हा आहे, वाचकांनी ती फक्त माहितीच्या अंतर्गत घ्यावी.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT