Hindu Culture esakal
संस्कृती

Hindu Culture : लग्नात नवरीला उलटं मंगळसूत्र का घालतात? जाणून घ्या मंगळसूत्राचं महत्व

लग्नात मंगळसूत्र उलट घालतात आणि १६ दिवसांनी नवरी ते सरळ करते, असं का जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Hindu Rituals Mangalsutra : हिंदू लग्न परंपरेनुसार लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलो. हिंदू विवाह पद्धतीत मंगळसूत्राला फार महत्व आहे. हल्ली काही मुलींना लग्नानंतर मंगळसूत्र घालायला आवडत नाही. तर काहींची अजून काही वेगळी कारणं असू शकतात. पण एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की, नवीन नवरी म्हणजे लग्नात आणि लग्नानंतरच्या काही दिवस मुलीच्या गळ्यात उलटं मंगळसूत्र असतं. जे साधारण १६ दिवसांनी सरळ केलं जातं.

पण या मागचं कारण काय हे तुम्हाला माहिती आहे का? तसंच मंगळसूत्राचं महत्व काय जाणून घ्या.

मंगळसूत्राचं वैज्ञानिक महत्व

वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास, मंगळसूत्रामुळे लग्न झालेली स्त्री नेहमी आनंदी राहते. तसेच या मंगळसूत्रामधील वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा ते तिच्यासाठी उत्तम ठरते. याचं कारण आहे की, त्या वाट्या सोन्याच्या असतात. सोनं महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. म्हणूनच नववधूचं मंगळसूत्र मोठ बनवलं जातं. सोने आणि चांदी हे महिल्यांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. मंगळसूत्रातले काळे मोती हे महिलांना राहू, केतू, शनिच्या दुष्प्रभावापासून वाचवतो. पण आता महिला आपल्या आवडीनुसार लहान मोठं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइनचे मंगळसूत्र वापरतात.

मंगळसूत्र उलटं का घालतात?

मंगळसूत्रात दोन धाग्यांमध्ये काळेमणी गुंफलेले असात. मध्यभागी ४ छोटेमणी २ लहान वाट्या असतात. यातली एक वाटी माहेरची तर दुसरी सासरची असतं. दोन दोरे म्हणजे पतीपत्नीचे बंधन चार काळे मी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ असतात. मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्यतंतू म्हणतात.

मंगळसूत्राच्या दोन वाट्यांपैकी एकात हळद आणि दुसऱ्यात कुंकू भरून उलटं मंगळसूत्र घातलं जातं. जेणे करून इतरांना समजतं की, महिला नुकतीच सौभाग्यवती झाली आहे. तिचं नुकतच लग्न झालं आहे. महिलांसाठी मंगळसूत्र खूपच महत्वाचे असते. नेपाळ, श्रीलंका या देशांमध्ये मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये तर त्या महिलेचं रक्षा कवच समजलं जातं.

काळ्या मण्यांचं काय आहे महत्व?

आपल्याकडे आपण म्हणतो की, नव्या गोष्टींना नजर पटकन लागते. अशात संसाराला कोणीची नजर लागू नये, संसार सुखाचा व्हावा यासाठी काळे मणी असणारे मंगळसूत्र महिलांनी घालावे असे म्हटले जाते.

आपली पुरुषसत्ताक पद्धती आहे. यात मुलगी लग्नानंतर नवऱ्याच्या घरी रहायला जाते. त्यामुळे तिला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. तिची चीडचीड कमी व्हावी आणि मन, चित्त थाऱ्यावर रहावं म्हणून सोन्याच्या धातून काळेमणी ओवलेलं मंगळसूत्र महिलांना घातले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरात ६० लाखांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त; १३१ गोवंशांची सुटका, ८ आरोपींवर ४ गुन्हे दाखल

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT