International Museum Day sakal
संस्कृती

International Museum Day: संग्रहालयांतून संस्‍कृती संवर्धनाचा वसा आणि जपली जाते इतिहासाची शान

Importance of Museums in Preserving Cultural Heritage: संग्रहालयाच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीचा वारसा आणि इतिहास जपतो – याच जाणिवेला वाहिलेला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन!

सकाळ वृत्तसेवा

How Museums Contribute to History and Culture: आपली संस्कृती व इतिहास याचे जतन करणारे केंद्र म्हणून संग्रहालयांकडे पाहिले जाते. अशा संग्रहालयातून सांस्कृतिक देवाण-घेवाण व संस्कृतीचे समृद्धीकरण होते. संग्रहालयाचे महत्त्व सर्वांना माहीत व्हावे, संग्रहालयाच्या कामांची प्रशंसा व्हावी, याकरिता जगभरात १८ मे हा दिवस ‘जागतिक संग्रहालय दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशभरात अनेक संग्रहालय आहे; परंतु त्यातील अनेकांची आपल्याला माहिती नसते. कोकणातील अशाच काही संग्रहालयाची माहिती या दिनानिमित्त आपण घेत आहोत.

प्राचीन कोकण

प्राचीन कोकण हे गणपतीपुळे येथील तीन एकर परिसरात वसलेले संग्रहालय आहे. संग्रहालय गणपतीपुळे बसथांब्‍यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आणि गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यापासून एक किमी अंतरावर आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या कोकणी जीवनशैलीचे दर्शन आणि कोकणची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल, याठिकाणी एकदा तरी भेट द्यावी. भारतातील सर्वात मोठ्या ओपन-एअर संग्रहालयांपैकी ते एक आहे. ऐतिहासिक क्षणांचे वर्णन करणारी शिवाजी महाराजांची शिल्पे आणि सागरी किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे आहेत.

पित्रे कला संग्रहालय

देवरूख येथे असलेले लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय कलाप्रेमींसाठी पर्वणीच आहे. कोकणातील हे पहिलेच दृश्य कला संग्रहालय आहे. २०१४ मध्ये स्थापन झालेल्या या संग्रहालयात रत्नागिरी जिल्ह्यासह आसपासच्या कलाकारांची तैलचित्रे, जलरंग इत्यादींचा संग्रह आहे.

अलिबाग तालुक्यातील करमरकर संग्रहालय

अलिबाग तालुक्‍यातील सासवणे गावात हे छोटे मात्र वैशिष्‍ट्यपूर्ण असे करमरकर संग्रहालय आहे. पद्मश्री व्ही. पी. करमरकर यांच्या (विनायक पांडुरंग करमरकर) कलाकृती प्रदर्शनात पाहता येतात. संग्रहालयात खास करून १५० हून अधिक कोरीव शिल्पे आहेत. अंगणात अनेक प्राण्यांची, माणसांची शिल्पे पाहता येतात. म्हशीचे शिल्प तर इतके हुबेहूब आहे, की अंगणात खरोखरच म्हैस बसली आहे, असे वाटते. संग्रहालयात शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे साकारण्यात आले आहेत. त्यांच्या शंखध्वनी, मत्स्यकन्या अशा त्यांच्या अनेक शिल्पांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.

टिळकांचे जन्मस्थान

लोकमान्य टिळक जन्मस्थान संग्रहालय हे महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे आहे. हे संग्रहालय त्यांच्या जीवनातील प्रारंभिक वर्षांची आठवण म्हणून आणि त्यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी उभारले आहे. संग्रहालयात टिळक यांच्याशी संबंधित वस्तू, फोटो आणि कागदपत्रे आहेत, जे त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यांची माहिती देतात. टिळकांच्या आयुष्यातील विविध स्मृती इथे जपल्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : मटण- चिकन बंदीच्या निषेधार्थ इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; मुख्यमंत्र्याना निमंत्रण, म्हणाले- आज देशातील...

Latest Marathi News Live Updates : मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार अर्जुन खोतकरांना राखी बांधली

Water Security: महाराष्ट्राची जलसुरक्षा आणि सुरक्षितता सुधारून तसेच टिकवून ठेवण्यासाठी सार्वजनिक वित्तपुरवठा पूरक असलेल्या खाजगी वित्तपुरवठ्यात संभाव्य गुंतवणुकीच्या संधी

PMPML Bus : पीएमपीएमएलची पैशांची उधळपट्टी; बस नसलेल्या मार्गांवर लाखो खर्चून उभारले शेड

Shubman Gill कसोटीनंतर वनडे, टी२०मध्येही होणार भारताचा कर्णधार, BCCI कडूनही संकेत; वाचा असं कोण म्हणालं

SCROLL FOR NEXT