Kartiki Ekadashi 2022 esakal
संस्कृती

Kartiki Ekadashi 2022 : कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कार्तिक एकादशी म्हणतात

सकाळ डिजिटल टीम

Kartiki Ekadashi 2022 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कार्तिक एकादशी म्हणतात. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असेही म्हणतात.आज कार्तिक एकादशी आहे. आषाढी एकादशीला असते तशीच भक्तांची मांदियाळी पंढरीत पाहायला मिळत आहे.

काल म्हणजे कार्तिक एकादशीच्या पूर्वसंध्येला चंद्रभागा तीरी स्नान करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. शास्त्रात जसे आषाढी वारीला महत्त्व आहे तसेच कार्तिक वारीलाही आहे.लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.

आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठूरायची पूजा केली. आजच्या या एकादशीला देवउठणी एकादशी असेही म्हणतात. त्यामागील महत्व काय आहे हे जाणून घेऊयात.

कार्तिकी एकादशीला चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासात चार महिने निद्रावस्थेत जातात. ते कार्तिक एकादशीला जागे होतात आणि पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा करण्यासाठी उभे ठाकतात, अशी मान्यता आहे.

त्यामुळे हिला देवोत्थनी, देवउठणी एकादशी असेही म्हणतात.कार्तिक शुद्ध एकादशी ही देवप्रबोधनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात.

कार्तिक एकादशीचे महत्त्व

देवशयनी एकादशीपासून प्रबोधिनी एकादशीपर्यंत चार महिने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. कारण भगवान विष्णू हे चार महिने योगनिद्रामध्ये राहतात.त्याकाळात कोणतेही महत्त्वाचे काम करू नये असे सांगितले जाते. कार्तिकी एकादशीला मांगलिक कार्यांच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे. कारण या तिथीपासून लग्न, मुंज, गृहप्रवेश आदी मंगल कार्यांना सुरुवात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT