Bhagwan Mahadev symbol and life  Esakal
संस्कृती

Bhagwan Mahadev: भगवान महादेवाच्या ‘या’ प्रतीकांचा तुमच्या Life शी काय आहे संबध? जाणून घ्या प्रतिकांचं रहस्य

Mahadev symbol meaning: भगवान महादेवाबद्दल Bhagwan Mahadev जाणून घ्यायचं असेल, त्यांच्या रुपांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या खास प्रतिक चिन्हांबद्दल Symbols जाणून घ्यायला हवं

Kirti Wadkar

Bhagwan Mahadev : भगवान महादेवाचे भारतातच नव्हे तर जगभरात शेकडो भक्त आहेत. महादेवाचं आपल्यावर कायमच आशीर्वाद राहावा म्हणून त्यांचे भक्त मनोभावे त्यांची पूजा करतात.

महादेवाचं Bhagwan Mahadev वैरागी रुप त्याची वेषभूषा ही इतर देवतांहून निराळी आहे. त्यांच्या बद्दल अधिअधिक जाणून घेण्यासाठी शिवभक्त Shiva Devotees कायमच उत्सुक असतात. Know about Bhagwan Mahadev Symbols

भगवान महादेवाबद्दल Bhagwan Mahadev जाणून घ्यायचं असेल, त्यांच्या रुपांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या खास प्रतिक चिन्हांबद्दल Symbols जाणून घ्यायला हवं. त्याच्या या प्रतिक चिन्हांमुळे त्यांचा आपल्या सभोवताली अस्तित्व असल्याचं आपल्याला जाणवू शकतं. 

ज्योतिष शास्त्रामध्ये तर शिव शंकराची ही प्रतिकं घरात लावण्याचा सल्ला दिला जातो. ही प्रतिकं जर तुमच्या घरात असतील तर महादेवाचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम राहील.

खरं तर महादेवाची ही प्रतिकं आपल्या आयुष्यासोबत आणि जीवनचक्रासोबत जोडली गेली आहेत. ही चिन्ह भगवान महादेव आपल्या सोबतच आहेत याचे वेळोवेळी संकेत देत असतात.

भगवान महादेवाच्या या प्रतिकांचं एक वेगळं महत्व आणि प्रत्येकाचं खास रहस्य देखील आहे. महादेवाच्या याच प्रतिकांबद्दल आणि त्यांचं महत्व आणि संकेतांबद्दल आज जाणून घेऊयात.

हे देखिल वाचा-

अर्ध चंद्र- भगवान महादेवाच्या मस्तकावर अर्ध चंद्र विराजमान आहे जे काळाचं प्रतिक मानलं जातं. याचा आपल्या जीवनाशी संबध आहे. जो कुणी थोड्या काळासाठी हा होईना मात्र आपल्या मनावर ताबा ठेऊ शकतो किंवा ज्याला काही काळासाठी मनावर ताबा ठेवता आला त्याच्यात शिव शंकराच्या उर्जेचा स्त्रोत उत्त्पन्न झाला आहे. 

तिसरा डोळा- महादेवाचे तीन डोळे आहेत. तीसऱ्या डोळ्याचा अर्थ अशा गोष्टींचा अनुभव घेणं जे सामान्य दृष्टीने घेणं शक्य नाही किंवा जे डोळ्याना दिसतं नाही अशा गोष्टींचा अनुभव घेणं. ज्याकुणी आपल्या सकारात्मक दृष्टीकोनातून काहीतरी भिन्न किंवा चांगलं करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यात महादेवाची ऊर्जा निर्माण झाली आहे. 

त्रिशूल- भगवान शिवाचं त्रिशूल हे केवळ एक शस्त्र नसून ते मानवी शरीरात असलेल्या नाडीचं सूचक मानलं जातं. याचा मानवी जीवनाशी संबध असा आहे की ज्याने योग्य ज्ञान ग्रहण केलं आणि त्या ज्ञानाचा समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग केला त्याच्यामध्ये महादेवाच्या उर्जेचा स्त्रोत निर्माण झाला आहे. 

रुद्राक्ष- महादेवाच्या अश्रूंमधुन रुद्राक्षाची निर्मिती झाली आहे. रुद्राक्ष हे उत्त्पतीच किंवा निर्मितीचं प्रतीक मानलं जातं. ज्याने आपल्या कलेने किंवा महादेवाच्या भक्तीने स्वत:मध्ये कोणतीही नवीन शक्ती निर्माण केली असेल त्याच्यामध्ये शिव शंभूच्या उर्जेचा स्त्रोत निर्माण झाला आहे असा आपल्या जीवनाशी रुद्राक्षाचा संबध आहे. 

सर्प- शिव शंकराच्या गळ्याभोवती विराजमान असलेला सर्प काळाच्या चक्राचं प्रितिनिधीत्व करतो. याचा आपल्या जीवनाशी असा संबध आहे की ज्याने भूत, वर्तमान आणि भविष्यात प्रभू भक्तीत लीन होवून प्रत्येक सजीवाची सेवाल केली आहे. त्याच्यावर महादेवाची कृपादृष्टी सदैव आहे. 

हे देखिल वाचा-

डमरू- महादेवाच्या हातातील डमरू म्हणजे अवगुणांवर विजय कसं मिळावा याचं प्रतिक आहे. ज्याने आपले अवगुण ओळखून ते दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला थोडं जरी यश मिळालं असेल तर त्याच्यामध्ये महादेवाची ऊर्जा निर्माण झाली आहे. 

त्रिपुंड- शिव शंकराच्या माथ्यावर असलेलं त्रिपुंड तिळके त्यांच्या मस्तकावर धारण केलेल्या २७ देवता आणि ध्यानाचं प्रतीक आहे. ज्याने आपल्यातील ३६ गुणांपैकी २७ गुण ध्यान शक्तीने जागृत केले आहेत त्यात महादेवाचा ऊर्जा स्त्रोत निर्माण झाला आहे. 

हे महादेवाची प्रतीक चिन्ह जी अनेक संकेत देतात आणि आपल्या जीवनाशी संबंधीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT