महत्त्व हनुमान चालिसाचे Esakal
संस्कृती

Lord Hanuman मारुतीरायाच्या आशिर्वादासाठी जाणून घ्या हनुमान चालीसातील या ओव्या

हनुमान चालीसामधील प्रत्येकी ओवीचा खास अर्थ आहे. हनुमान चालीसाचं पठण करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. हनुमान चालीसामधील प्रत्येक पंक्ती एखाद्या मंत्राप्रमाणे आहे. यातील मंत्रोच्चारांमुळे सुख-शांती आणि धनलाभ होण्यास मदत होते

Kirti Wadkar

रामाचा परम भक्त मारुतीरायाच्या भक्तीमुळे अनेकांच्या इच्छा पूर्ण होतात. संकटं दूर करून संकटांशी दोन हात करण्याची शक्ती मिळण्यासाठी मारुतीरायाचे आशीर्वाद पाठीशी हवे असतील तर मंगळवारी हनुमानाची Lord Hanuman पूजा करावी. मंगळवारचा दिवस हनुमानाच्या पुजेसाठी चांगला मानला जातो. Know the importance of Hanuman Chalisa

हनुमान किंवा मारुतीरायाला Lord Maruti कलियुगाचा देव मानलं जातं. मारुतीराया आपल्या भक्तांच्या संकटकाळात कायम त्यांच्या पाठीशी उभा राहतो. हनुमानाच्या पुजा अर्चेत किंवा हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसाचा Hanuman Chalisa पाठ करावा. या हनुमान चालीसामधील देखील काही ओव्या या अत्यंत प्रभावशाली आहेत.

हनुमान चालीसामधील प्रत्येकी ओवीचा खास अर्थ आहे. हनुमान चालीसाचं पठण करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. हनुमान चालीसामधील प्रत्येक पंक्ती एखाद्या मंत्राप्रमाणे आहे. यातील मंत्रोच्चारांमुळे सुख-शांती आणि धनलाभ होण्यास मदत होते. या ओव्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्याचा अर्थ काय याबद्दल जाणून घेऊयात.

सब सुख लहे तुम्हारी सरना,तुम रक्षक काहू को डरना

हनुमान चालीसामधील या ओवीचं पठण केल्यास मारुतीरायाचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी नांदते. जर तुम्हाला सतत एखाद्या व्यक्तीकडून त्रास दिला जात असेल किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भिती वाटत असेल तर या ओवीचं वेळोवेळी पठण करावं किंवा स्मरण करावं.

हे देखिल वाचा-

आपन तेज सम्हारो आपे, तीनो लोक हांक ते कांपे

भूत पिशाच निकट नहि आवे, महावीर जब नाम सुनावे

तुमच्या वेग प्रचंड असून त्याला कुणीही रोखू शकत नाही. केवळ तुम्हीच तुमच्या वेगाला रोखू शकता असा या ओवीचा अर्थ आहे. बजरंगबली हनुमानाचा तिन्ही लोक म्हणजे आकाश, धरती आणि पाताळ लोकातही दरारा आहे. त्यामुळे तुमच्या भक्तांना भूत-पिशाच्च अशा शक्तींना घाबरण्याची आवश्यकताच नाही.

जर एखादी व्यक्ती सतत कोणत्याही गोष्टीला घाबरत असेल तर या पंक्तींचा सतत जप करावा. यामुळे मनातील भिती दूर होण्यास मदत होते.

नाशे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा

संकट ते हनुमान छुड़ावै, मन क्रम वचन ध्यान जो लावे

ज्या व्यक्तींना सतत विविध आजारांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तींनी नियमितपणे या ओव्यांचा जप करावा. हनुमान चालीसाच्या पठणाने संकटं दूर होतात. तसंच रोग नष्ट होतात.

साधु संत के तुम रखवारे,असुर निकंदन राम दुलारे

अष्टसिद्धि नवनिधि के दाता, अस बर दीन जानकी माता।

श्रीरामाचा भक्त असलेला बजरंगबली सज्जनांची रक्षा करतो आणि दुष्टांचा विनाश. प्रत्येक युगामध्ये हनुमान विद्यामान आहे. त्याच्या महानता आणि पराक्रमाची किमया साऱ्या विश्वाला ठाऊक आहे. इतके महान असूनही मारुतीराया सतं आणि भक्तांच्या पाठीशी कायम उभा असतो.

हे देखिल वाचा-

जर तुम्हाला आयुष्यात शक्ती मिळवायची आहे, यश मिळवायचंय तर या ओव्यांचा पाठ करा. देवी सीतेच्या आशीर्वादाने मारुतीरायाला आठ सिद्धी आणि नऊ निधि प्राप्त झाल्या आहेत. अशा रामभक्त हनुमानाच्या भक्तीने तुम्हाला देखील शक्ती प्रात्प होतील.

अशा प्रकारे संकटमोचन हनुमानाच्या भक्तांनी हनुमान चालीसाचा पाठ करून त्याचे आशीर्वाद मिळवू शकतात.

टीप - ही माहिती सर्वसाधारण गृहितकांवर आधारित आहे. यात अंधश्रद्धा पसरविण्याचा कुठलाही हेतू नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT