Kojagiri Purnima esakal
संस्कृती

Kojagiri Purnima 2022 : कोजागिरीला खीर खाण्याने होतात लाभ; बनवा ही खास ‘खीर’

यंदा कोजागिरीला दुध नाही तर काही स्पेशल खीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोजागिरी पौर्णिमा अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे घरोघरी त्याची तयारी केली जात आहे. महिला वर्ग तर मसाले दुधाच्या वेगवेगळ्या रेसिपी शोधण्यात गुंग असतील. आता आपल्या माहीतीनुसार कोजागिरीला काही खास नसतं. तर केवळ दुध घ्यायच आणि टेरेसवर, अंगणात जाऊन प्यायचं एवढंच करतात. पण, तस नाही. कोजागिरी पौर्णिमेला उगवणारा चंद्र स्पेशल असतो. त्यामुळे त्यादिवशी केवळ दुध नाही तर काही स्पेशल खीर हि बनवल्या जातात.

शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण होऊन पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो. या दिवशी चांदण्या रात्री चांदीच्या भांड्यात खीर ठेवण्याची प्रथा आहे. खीरमध्ये दूध, साखर, ड्रायफ्रुट्स असतात. यासारख्या घटकांचा कारक देखील चंद्र आहे. म्हणून त्यामध्ये चंद्राचा प्रभाव पडतो सर्वात महत्वाचा आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्राचा प्रकाश खीरीवर पडतो. तेव्हा या खीरीत अमृत उतरते. निसर्गोपचारात ही खीर काही औषधे मिसळून खाल्ली जाते आणि दम्याच्या रुग्णांनाही दिली जाते. ही खीर पित्तशामक, शीतल, सात्विक असण्यासोबतच वर्षभर आनंद आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

दूध पोहे खीर

दूध पोहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बनवला जाणारा गुजराती पदार्थ आहे.

साहीत्य

२ कप जाड पोहे, ३ कप दूध, 4 ते 6 चमचे साखर, 1 टीस्पून वेलची पावडर, 1/4 टीस्पून जायफळ पावडर, १/२ टीस्पून केशर, १/३ कप मिक्स ड्रायफ्रुट्स

कृती

एका पातेल्यात तूप घेऊन त्यात पोहे परतून घ्या. थोडे दुध घालून ढवळत रहा. आता थोडावेळ शिजवून घ्या. त्यामध्ये आणखी दूध, साखर आणि ड्रायफ्रुट्स घाला. हवा असल्यास तूम्ही खवा घालू शकता. यामुळे खीरीला घट्टपणा येतो. त्यानंतर वेलची पुड घालून दहा मिनीटे शिजवा.

साबुदाणा खीर

साहीत्य

1 वाटी साबुदाणा, 1/2 लिटर दूध, 1/2 वाटी साखर, 1 वेलची, 10 बदाम आणि काजूचे तुकडे

कृती

भांड्यात दुध तापायला ठेवा. दुध उकळल्यावर त्यात साबुदाणा घाला. साबुदाणा मउ झाला ती त्यामध्ये साखर आणि वेलची घाला. थोडी उकळी आली की मंद आचेवर साबुदाणा शिजू द्या. त्यानंतर काजू बदामचे काप बारीक करून तूपामध्ये फ्राय करा आणि खीरीमध्ये घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT