Pratapgad Fort esakal
संस्कृती

Pratapgad Fort : प्रतापगड किल्ला 364 मशालींनी उजळला; भवानीमातेच्या दर्शनासाठी गडावर भाविकांची मोठी गर्दी

किल्ल्याच्या चहूबाजूंनी विद्युतरोषणाई करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

गडावर सर्वत्र लावलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला.

महाबळेश्वर : किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort) आज ३६४ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. महोत्सव पाहण्यासाठी व श्री भवानीमातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी किल्ले प्रतापगडावर गर्दी केली होती. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी मशाल महोत्सवासाठी विशेष उपस्थिती होती.

हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. ढोलताशांचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीने अवघा गड व परिसरात उजळून निघाला. आज भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री नऊच्या दरम्यान ढोल, ताशांच्या गजरात ‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.

हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वेळी नगारे, तुतारी, सनई, तसेच प्रतापगडावरील स्वराज्य ढोल, ताशा, पथक व लेझीमच्या गजरात, तसेच भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. या वेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

गडावर सर्वत्र लावलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला. किल्ल्याच्या चहूबाजूंनी विद्युतरोषणाई करण्यात आली होती. भवानीमाता मंदिर ते बुरुजापर्यंत लावलेल्या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT