Makar Sankranti 2023 sakal
संस्कृती

Makar Sankranti 2023 : 14 की 15 जानेवारी, कोणत्या दिवशी साजरी करायची मकर संक्रांती?

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Makar Sankranti 2023 : जेव्हा सुर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या पर्वाला मकर संक्रांती असे म्हणतात. दरवर्षी मकर संक्राती ही 14 किंवा 15 जानेवारीला साजरी केली जाते. देशाच्या वेगवेगळ्या भागात मकर संक्राती ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याशिवाय काही ठिकाणी मकर संक्राती 14 जानेवारी तर काही ठिकाणी 15 जानेवारीला साजरी केली जाते.

महाराष्ट्राच्या अनुषंगाने मकर संक्राती केव्हा साजरी करावी? 14 जानेवारी की 15 जानेवारी कोणत्या दिवशी मकर संक्राती साजरी करावी? जाणून घेऊया. (Makar Sankranti 2023 on which date14 or 15 january when makar sankranti will be celebrated )

14 किंवा 15 जानेवारी केव्हा साजरी करायची मकर संक्रांती?
हिंदू पंचांगनुसार, 14 जानेवारी शनिवारला सूर्य देव रात्री 8 वाजून 43 मिनिटांवर मकर राशीत प्रवेश करणार. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्नान, दान-धर्माचे कार्य वर्जित होतात. यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी करणे, योग्य नाही. दुसऱ्या दिवशी सुर्य उगवल्यानंतर 15 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जावी.

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या सकाळी 07 वाजून 15 मिनटांपासून ते सायंकाळी 05 वाजून 46 मिनटांपर्यंत मकर संक्रांतीचा शुभकाळ असणार. या शुभकाळात स्नान, दान-धर्म करणे शुभ मानले जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी रविवारी येत असल्याने या सणाचे महत्त्व वाढले. कारण रविवार हा सूर्य देवाला समर्पित असतो. याशिवाय या दिवशी दुपारी 12 वाजून 09 मिनटांपासून दुपारी 12 वाजून 52 मिनटापर्यंत अभिजीत मुहूर्त असणार. दुपारी 02 वाजून 16 मिनटांपासून 02 वाजून 58 मिनटापर्यंत विजय मुहूर्त असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT