Dhoop Agarbatti Making esakal
संस्कृती

Dhoop Agarbatti Making : पूजेतील निर्माल्यापासून बनवा सुगंधी अगरबत्ती, घरात दरवळेल सुगंधच सुगंध

या फुलांचे निर्माल्यात रूपांतर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे काय? या फुलांचा दुसऱ्या दिवशी असा उपयोग केल्यास तुमच्या घरात सुगंधच सुगंध दरवळेल.

साक्षी राऊत

Dhoop Batti Making : नवरात्रीमध्ये अनेकांच्या घरी घटस्थापना करतात. नवरात्रीत विधीवत पूजा केल्यास भक्तांना त्याचे फळ मिळते अशी मान्यता आहे. पूजेच्या वेळी देवीच्या चरणी फुले अर्पण करतात. मात्र या फुलांचे निर्माल्यात रूपांतर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे काय? या फुलांचा दुसऱ्या दिवशी असा उपयोग केल्यास तुमच्या घरात सुगंधच सुगंध दरवळेल.

पूजेमध्ये अगरबत्ती, कापूर, दिवा आणि धूप अगरबत्तीचा वापर केला जातो. सुगंध दरवळतो तेव्हा सगळीकडे सकारात्मकता पसरते असे म्हणतात. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधित अगरबत्ती उपलब्ध असतात. मात्र तुम्ही घरीसुद्धा सुकलेल्या फुलांपासून सुगंधित धूप अगरबत्ती विकत घेऊ शकता.

ही धूप अगरबत्ती बनवण्यासाठी सुक्या फुलांची गरज असते. पूजेत वाहिलेल्या फुलांचा तुम्ही दुसऱ्या दिवशी धूप अगबत्तीसाठी वापर करू शकता.

होममेड धूप अगरबत्तीसाठी लागणारे साहित्य

५-७ झेंडूची फुले

६-७ गुलाबाची फुलं

१-२ तमालपत्र

३-६ कापराच्या गोळ्या

कोळसा आणि गौरीचा भुगा

हवन साहित्य

चंदन पावडर

३ चमचे तूप

२ चमचे तिळाचे तेल

१ चमचा मध

धूप बनवण्यासाठी सगळ्यात आधी सुकलेली फुले, कोळशाचा लहान तुकडा, शेणाच्या गौरीचा भुगा, तमालपत्र, चंदन आणि हवन चूर्ण मिसळून बारीक करून घ्या. तयार झालेली पावडर चाळणीने चाळून घ्या. (Navratri)

एकदा पावडर तयार झाल्यानंतर त्यात तूप, तिळाचे तेल, मध आणि पाणी मिक्स करा. यात पाण्याचे प्रमाण २-३ चमच्यांच्या वर नसावे.

आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे पिठाप्रमाणे मळून मार्केटमध्ये मिळणाऱ्या धूप अगरबत्तीप्रमाणे लहान लहान तयार करून घ्या.

ही धूप अगरबत्ती बनवताना फुलं सुकलेली असावी याकडे विशेष लक्ष द्या. ओलसर फुलांपासून बनवलेली धूप अगरबत्ती लवकर जळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

लष्कराच्या कामाचं कंत्राट देण्यासाठी ५० लाखांची लाच, कर्नलला अटक; CBIच्या कारवाईने खळबळ

Latest Marathi News Live Update : ३० जूनपर्यंतच संधी; HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कडक कारवाई

IPL: मुंबई-कोलकतामध्ये केवळ वर्चस्वाची लढाई; अजिंक्य रहाणेचा संघ पराभवाची परतफेड करणार?

SCROLL FOR NEXT