New Year Upay
New Year Upay esakal
संस्कृती

New Year Upay: नव्या वर्षात राशीनुसार करा हे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मी मातेची कृपा

सकाळ ऑनलाईन टीम

New Year Upay: आजपासून नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे. तेव्हा नव्या वर्षात तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे काही उपाय केलेत तर वर्षभर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीत काय उपाय आहेत आणि ते कसे करावेत जाणून घेऊया.

नवे वर्ष तुमच्या आयुष्यात चांगले असावे, सुखसमृद्धी नांदावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे उपाय नक्कीच करायला हवेत.

ज्यांची रास मेष आणि वृश्चिक आहे, त्यांच्या राशीत स्वामी मंगळ आहे. अशांनी त्यांच्या आयुष्यात अडचणी, विघ्न येऊ नये असे वाटत असेल तर मंगळवारी मसूरची दाळ पक्ष्यांना घालावी. तसेच अंघोळ करताना पाण्यात लाल चंदन पावडर टाकावे. याने तुम्हाला फायदा होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील.

ज्यांची राशी वृषभ किंवा तूळ आहे, त्यांचा स्वामी शुक्र आहे. शुक्रवारी खीर बनवून ती थंड करून गायीला खाऊ घालावी. शुक्रवारी तांदळाचे दाणे पक्ष्यांना घाला. याशिवाय आंघोळ करताना पाण्यात थोडी वेलची पावडर, थोडेसे केशर टाकल्यास खूप फायदा होईल.

मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. राहूला कन्या राशीचा स्वामी देखील मानला जातो. या राशीच्या लोकांनी बुधवारी पक्ष्यांना हिरव्या मुगाचे काही दाणे टाकावेत आणि त्यांना हवे असल्यास ते गायीलाही खाऊ शकतात. दर बुधवारी ओम गणपतये नमः मंत्राचा जप करा आणि विष्णु सहस्त्रनामचा पाठ करा आणि गुरु मंत्राचाही जप करा.

चंद्र कर्क राशीचा स्वामी मानला जातो. कर्क राशीच्या प्रत्येक सोमवारी पक्ष्यांना तांदळाचे दाणे खायला द्यावे. सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा आणि गंगाजल अर्पण केल्यानंतर या मंत्राचा जप करा.

ओम त्रयम्बकम यजमहे सुगंधी पुष्टीवर्धनम् उर्वरुकमिव बंधननामृत्यो मृक्ष्य ममृतात्।

यासोबतच प्रत्येक पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्यावे.

सूर्य हा सिंह राशीचा स्वामी मानला जातो. सूर्याला रोज अर्घ्य द्यावे. सिंह राशीच्या लोकांनी दर रविवारी पक्ष्यांना गव्हाचे दाणे खायला द्यावे. गव्हाच्या पिठाची आणि गुळाची भाकरी गायीला खायला द्या. जर तुम्हाला गाय मिळत नसेल तर ती एखाद्या गरीबाला द्या आणि गुरु मंत्राचा भरपूर जप करा.

ज्या लोकांची राशी धनु आणि मीन असते, त्यांचा स्वामी गुरु असतो. त्याचबरोबर मीन राशीचा स्वामी केतू देखील सांगितला आहे. धनु आणि मीन राशीच्या लोकांनी गुरूंचा आदर करावा आणि आई-वडिलांना कधीही वाईट बोलू नये. गुरुवारी तुम्ही आंब्याच्या झाडावर तांदूळ, पाणी आणि हरभऱ्याचे धान्य एकत्र करून अर्पण करू शकता आणि थोडा वेळ बसून गुरु मंत्राचा जप करू शकता.

मकर आणि कुंभ राशीचे लोक

शनिदेवाला मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानले जाते. या राशीच्या लोकांनी रोज हनुमान चालिसाचे पठण करावे आणि दर शुक्रवारी माँ लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT