Tukaram Beej  esakal
संस्कृती

Tukaram Beej : फक्त देहुतच नाही 'या'ही ठिकाणी आहेत नांदुरकीसारखे वृक्ष...

तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस.

सकाळ डिजिटल टीम

Sant Tukaram Maharaj Beej : तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. तारखेनुसार, ९ मार्च हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो.

मोशी-आळंदी (Moshi - Alandi) या मार्गावर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) पादुका स्थळावर एक कोरीव मध्ययुगीन शिलालेख आढळून आला आहे, त्यावर ‘तुकाराम बोवा’ असे लिहिले आहे.

काळाच्या ओघात अजून काही अक्षरे किंवा कोरीव रेखाटने नष्ट झाल्याची शक्यता आहे. वारीच्या वाटेवर भक्तिभाव वाढीस लागावा आणि क्षणभर विसावा मिळावा म्हणून तुळशी वृंदावनासारखी शिल्पे कोरुन प्रतिकात्मक पादुका स्थापन केल्या गेल्या आहेत. (Inscription found Tukobas Paduka site)

मोशी-डुडुळगावच्या शिवेवर असलेल्या ऑस्टीया डेस्टीनेशन येथील संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकास्थळीही शिवलिंग कोरले आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची समाधी आळंदीमध्ये श्री सिद्धेश्‍वराजवळ आहे म्हणून असे कोरीव काम केले आहे.

दोन्ही ठिकाणे एकमेकांपासून अंदाजे १०० मीटर अंतरावर आहेत. माऊलींच्या पादुका स्थळांचा जिर्णोद्धार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने २०१३-१४ मध्ये केल्याचा उल्लेख आढळला आहे. त्यावेळेस पादुका जीर्ण झाल्यामुळे त्यांची हुबेहूब प्रतिकृती आळंदी संस्थानाने तयार केली आहे.

मोशी येथील वनस्पती अभ्यासक प्रा. किशोर सस्ते म्हणाले, "संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पादुका स्थानावरील स्थळवृक्षांचा अभ्यास करताना हे शिलालेख आढळले आहेत. स्थळवृक्षांना आणि बरोबरच्या शिल्पांना वारसा स्थळ घोषित करण्याची गरज आहे."

अशी निर्माण झाली पादुका ठिकाणे

वारीसाठी आल्यावर सर्वांना छाया मिळावी म्हणून नांदुरकी वृक्षासारखी २५० वर्षे जुने वृक्ष या ठिकाणी आहेत. त्याच्या बुंध्याचा परीघ ४०० सेंमी इतका आहे. खालील बाजूस दगडी शिळांचा चौथरा बांधून त्यावर हे पादुका शिल्प उभारले आहे. सभोवती हिरवळीचे सुशोभीकरण आहे. दोन्ही ठिकाणे ही कोकणातून आळंदीच्या कार्तिकी वारीची विसावा स्थळे आहेत.

तुकाराम महाराज पूर्वी मोशी-डुडुळगाव मार्गे आळंदी येथे जात व माऊलींच्या पादुका घेऊन चऱ्होली लोहगाव मार्गे पंढरपुरास जात. हा मार्ग जुन्या पंढरपूर वारीचा आहे. आळंदीच्या चारही बाजूला अशी‌ पादुका ठिकाणे केळगाव, वडगाव घेनंद, सोळू, फुलगाव, चऱ्होली या ठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणी मोठे थोरले स्थळवृक्षे आणि पादुका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT