How does Narendra Modi’s kundli influence his leadership style: आज म्हणजेच ७ मे च्या मध्यरात्री, संपूर्ण भारत गाढ झोपेत असताना, आपल्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कर सज्ज होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ला करत ठोस कारवाई केली गेली.
संपूर्ण जग साखरझोपेत असताना भारतीय लष्कराने रात्री सुमारे 1.45 च्या दरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर लक्ष्य करत स्कैल्प क्षेपणास्त्राचा उपयोग केला. तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र न झोपता संपूर्ण ऑपरेशनदरम्यान परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून होते.
महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई अशा वेळी झाली, जेव्हा काही तासांपूर्वीच पंतप्रधान मोदी India@2047 या परिषदेत सहभागी झाले होते. कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव न दिसल्याने कुणालाही या ऑपरेशनची कल्पनाही नव्हती.
ही योजना आणि मानसिक शांतता पंतप्रधानांच्या नेतृत्वगुणांची ओळख करून देते. वेळेवर निर्णय घेणे आणि शांतपणे तो निर्णय अमलात आणणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच हे ऑपरेशन दहशतवाद्यांसाठी गुप्त आणि परिणामकारक ठरले. परंतु त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचं गुढ लपले आहे त्यांच्या कुंडलीत. कसे ते चला जाणून घेऊया.
पंतप्रधान मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमध्ये अभिजित मुहूर्तात झाला. त्यांच्या कुंडलीत वृश्चिक लग्न आहे आणि त्यात चंद्र आणि मंगळ एकत्र आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ही युती ‘नीचभंग राजयोग’ तयार करते. असा योग जो व्यक्तीला संघर्षातून पुढे नेतो आणि अडथळ्यांवर मात करून यश मिळवून देतो.
असे सांगितले जाते की या योगामुळे माणूस कितीही अडचणीत सापडला, तरी तो त्यातून अजून मजबूत होऊन बाहेर येतो. तो अधिकच प्रभावशाली आणि निर्णायक बनतो. पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासातही हे दिसून येते. त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात बराच विरोध सहन करावा लागला, पण नंतर म्हणजेच आता ते जागतिक स्तरावर नेतृत्व करतात.
असाच योग्य नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नेल्सन मंडेला यांच्या कुंडलीतही होता, ज्यांनी मोठ्या संघर्षांनंतर यशस्वी नेता म्हणून नाव कमावले होते.
मोदींच्या कुंडलीत शनि हा पराक्रम म्हणजे धाडस दाखवणाऱ्या गोष्टींचा कारक आहे. सध्या त्यांच्या कुंडलीत मंगळ महादशा आणि बुध अंतर्दशा चालू आहे. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की अशा वेळी माणूस जलद आणि ठोस निर्णय घेतो आणि लगेच कृतीही करतो. 'ऑपरेशन सिंदूर' हे याचं जिवंत उदाहरण आहे.
वृश्चिक लग्न असलेल्या लोकांची वैशिष्ट्यं म्हणजे ते गूढ, ठाम आणि संयमी असतात. त्यांच्या योजना बहुतेक वेळा गुप्त असतात आणि ते निर्णय अचानक घेतात, पण त्यात अचूकता आणि परिणामकारकता असते. त्यामुळे मोदी काय करणार हे विरोधकांना वेळेवर कळत नाही.
त्यामुळे ऑपरेशन सिंदूर ही एक लष्करी कारवाई नव्हती, तर भारताचे ठोस धोरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ठाम नेतृत्व तसेच भारतीय लष्कराच्या कामगिरीचे धाडसी उदाहरणच आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.