Pateti Festival 2023 esakal
संस्कृती

Parsi New Year : आजपासून पारशी बांधवांच्या नववर्षाला होणार सुरुवात, जाणून घ्या महत्व

पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस पतेती असतो.

धनश्री भावसार-बगाडे

What Is Importance Of Patete In Marathi :

पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस पतेती असतो. या दिवशी ते अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात.

भारतात १५ ऑगस्टला पतेती सण होता. तर १६ ऑगस्टला पारशी समाज नववर्ष साजरं करणार आहे. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ म्हणूनही ओळखला जातो. पारशी नूतन वर्षाचा आरंभ फरवर्दीन महिन्याने होतो.

पतेतीची सुरुवात काशी झाली?

झोरोस्टेरियन समुदायाच्या श्रद्धेनुसार ३००० वर्षांपूर्वी या दिवशी साह जमशेद यांनीच सर्वपर्थम पारसी लोकांनी त्याचा जलाभिषेक करून त्याला सिंहासनावर बसवले होते. जमशेद यांनीच सर्वप्रथम पारशी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली होती. तेव्हापासून पारशी समाजातील लोकांनी पतेती दिवस साजरा करण्यास सुरवात केली.

पारशी समाजातील लोक दरवर्षी पतेती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा असतो.

पतेती उत्सव

हिंदू धर्माप्रमाणेच पारसी धर्माचे लोकही अग्नीची पूजा करतात. हे लोक अग्नीला पवित्र मानतात आणि त्यात यज्ञही करतात. पारशी लोक या दिवशी नवीन कपडे घालतात आणि त्यांच्या पूजास्थळावर म्हणजेच अग्नी मंदिरात जातात आणि प्रार्थना करतात. त्यानंतर लोक एकमेकांमा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.

घरी एकमेकांना जेवायला बोलवतात. उत्सवाची तयारी महिनाभर आधी सुरु केली जाते. घरे साफ करून, फुलांनी, रंगांनी घरांची सजावट करतात, तसेच या दिवशी गोड पदार्थांचे सेवन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mill Workers Protest : मीरा भाईंदर झाकी है! गिरणी कामगारांच्या आंदोलनासाठी सेना-मनसे आले एकत्र; बाळा नांदगावकर म्हणाले...

'खुर्ची'वरून राडा... एक पोस्ट, दोन अधिकारी... CMO कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

Latest Maharashtra News Live Updates: वि. के. वयम् मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

Viral Video: सर्पमित्र कोब्रा पकडत होता, तेवढ्याच सापाने केला दंश... जाग्यावरच कोसळला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार प्रिया बापट आणि उमेश कामत; चित्रपटाचं नाव वाचलंत का?

SCROLL FOR NEXT