Ram Navami 2023 esakal
संस्कृती

Ram Navami 2023 : रामनवमीच्या दिवशी या वस्तू नक्की विकत घ्या, वर्षभर घरात पैसा अन् सुख नांदेल

यंदाची रामनवमी तुमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय बनवायची असेल, तर तुम्ही रामनवमीसाठी काही गोष्टी घरी आणल्याच पाहिजेत.

सकाळ ऑनलाईन टीम

Ram Navami 2023 : रामनवमी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या नवमीला चैत्र नवरात्रीची समाप्ती होईल आणि याच दिवशी भगवान श्रीरामाचा जन्मही झाला. चैत्र नवरात्री प्रामुख्याने भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याचे कारण मुळात त्यानंतर येणारी श्रीरामनवमी. देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल, परंतु तुम्हालाही यंदाची रामनवमी तुमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय बनवायची असेल, तर तुम्ही रामनवमीसाठी काही गोष्टी घरी आणल्याच पाहिजेत.

असे म्हणतात की या वस्तू घरात आणल्याने घरात भक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. रामनवमीला कोणकोणत्या वस्तू घरी आणाव्यात ते पाहूया.

रामनवमीला काय खरेदी करावी?

या दिवशी पूजेच्या वस्तू, शुभ वस्तू, पिवळ्या वस्तू किंवा सोने खरेदी करा.

रामनवमीच्या दिवशी चांदीचा हत्ती खरेदी करून घरात बसवावा.

रामनवमीला तुम्ही हनुमान किंवा श्री राम सीतेची मूर्ती देखील खरेदी करू शकता.

या दिवशी तुम्ही घरासाठी सजावटीच्या वस्तूही खरेदी करू शकता.

रामनवमीच्या दिवशी वाहन, जमीन किंवा इमारत खरेदी करणे देखील शुभ असते. (Astrology)

रामनवमी कशी साजरी केली जाते?

या दिवशी घरोघरी धार्मिक पुस्तकांचे पठण केले जाते. संध्याकाळी घरी रामरक्षा स्तोत्राचे पठण केले जाते. अनेक ठिकाणी भजन-कीर्तनाचे आयोजनही केले जाते. रामाची मूर्ती फुलांनी आणि हारांनी सजवली जाते आणि पाळणामध्ये स्थापित केली जाते. अनेक ठिकाणी पालख्या किंवा मिरवणुका काढल्या जातात. अयोध्येत वाढदिवसाच्या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Ram Navami)

या वस्तू घरात आणल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धीसह पैशांचाही वर्षाव होईल.

डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याला पाठिंबा देत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

Pune News : चेहरा दाखवला तरच मिळणार पगार; झाडणकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम, महापालिकेने विकसित केले ॲप

Nagpur Goa Shaktipeeth Highway : भाविकांच्या भावनांशी खेळ? शक्तिपीठ महामार्गावरून माहूर तीर्थक्षेत्र थेट 17 किलोमीटर लांब ढकलले; नव्या नकाशात कोणता केला बदल?

SCROLL FOR NEXT