Ram Navami 2023 esakal
संस्कृती

Ram Navami 2023 : प्रभू रामचंद्रांच्या रामसेतू कसा होता? नासाच्या संशोधनात आढळलं असं काही...

भारत श्रीलंकेला जोडणारा रामसेतू खरंच होता का?

सकाळ डिजिटल टीम

aआज राम नवमी आहे. या दिवशी संपूर्ण देशभर प्रभू श्रीरामांचा जयजयकार केला जात आहे. मंदिर आणि ठिकठीकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. देशभरात राम जन्मकाळ उत्सहात साजरा  केला जात आहे.

राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण रामायणाशी संबंधित एका वास्तूबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याबद्दल नासाच्या संशोधकांनीही संशोधन केले होते.   

प्रभू श्री रामचंद्रांनी १४ वर्ष वनवास भोगला. वनवासात असताना लंकाधिपती रावणाने सीता मातेला पळवून नेले. त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रभू श्रीरामांनी भारताला श्रीलंकेशी जोडणारा रामसेतू बांधला. ही गोष्ट तर घराघरात प्रसिद्ध आहे. पौराणिक ग्रंथाच्या आधारावर रामसेतूसंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

रामेश्वर येथे गेल्यावर रामसेतूची जागा पहायाला मिळते. येथील नाविक धनुषकोडीहून पर्यटकांना रामसेतूचे अवशेष दाखवयाला नेतात. या ठिकाणी समुद्राची खोली अत्यंत कमी असून, काही ठिकाणी तळ दिसतो.

भारत लंकेला जोडणारा राम सेतू

१००० किलोमीटरचा रामसेतू

धार्मिक ग्रंथांनुसार लंकेत जाण्यासाठी श्रीरामाच्या सैन्याला समुद्रावर १०० योजन (त्या काळातील मोजण्याचे माप) लांब आणि १०  योजन (१ योजन म्हणजे ८ किमी) रुंद पूल बांधावा लागला. नल आणि नीलसह हजारो वानरांच्या सेनेने पहिल्या दिवशी १४ योजन, दुसऱ्या दिवशी २० योजन, तिसऱ्या दिवशी २१ योजन, चौथ्या दिवशी २२ योजन आणि पाचव्या दिवशी २३ योजनवर दगडफेक केली. अशा प्रकारे ५ दिवसात १०० योजनचे काम पूर्ण झाले. आजच्या काळातील मोजणीनुसार रामसेतूची लांबी १००० किमीपेक्षा जास्त होती.

रामसेतू

आणि रामसेतूचे गुढ उकलले...

राम सेतूची नासाने काही छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. नासासह विविध संस्थांनी त्यावर वेगवेगळे संशोधन केले आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते भारत आणि श्रीलंका यांच्यातील रामसेतू हजारो वर्षे जुना आहे. सध्या या भारत आणि श्रीलंका यांच्यातील पुलाचा आकार फक्त ४८ किलोमीटर शिल्लक आहे, असाही एक तर्क आहे.

नासाच्या शास्त्रज्ञांच्यामते सॅटेलाईटने घेतलेले हा फोटो खरा आहे. भारत श्रीलंकेच्या दरम्यान असलेले हे गुढ स्पॉट एका पुलाचेच अवशेष आहेत. समुद्रावर दिसणाऱ्या त्या रेषेखाली दगड आहेत. ते दगड ७ हजार वर्ष जूने आहेत. तर, त्यावर जमलेली माती ४ हजार वर्ष जूनी आहे. हा पाण्याखाली असलेला पूल मानवनिर्मीत असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.

राम सेतूतील दगड सात हजार वर्षांपूर्वीचे आहेत

रामसेतूशी संबंधीत काही खास गोष्टी

संशोधनानुसार, रामसेतू ७००० वर्षांहून अधिक जुना आहे. धनुषकोडी आणि मन्नार बेटाच्या जवळील समुद्रकिना-याची कार्बन डेटिंगची तारीख रामायणातील त्या प्रसंगाच्या तारखेशी जुळते. या पूलावर १५ व्या शतकापर्यंत पायी जाता येत होता.

संशोधनानुसार १४८० पर्यंत रामसेतू पूर्णपणे समुद्रावर तरंगणारा होता. त्यानंतर चक्रीवादळामुळे तो समुद्रात बुडाला असल्याचे शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

सध्या अवशेष असलेला रामसेतू ५० किमी लांब असून तो मन्नारला पाल्क सामुद्रधुनीपासून वेगळे करतो. राम सेतूला अॅडम्स ब्रिज, नाला सेतू आणि सेतू बांदा म्हणूनही ओळखले जाते.

रामसेतूकडे रामायणातील ऐतिहासिक पुरावा म्हणून पाहिले जाते. महर्षि वाल्मिकींच्या रामायणात प्रथमच या सेतूचा उल्लेख आढळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT