Sant Mirabai
Sant Mirabai sakal
संस्कृती

Sant Mirabai : श्रीकृष्णाला पती मानणाऱ्या मीरेच्या वैवाहिक आयुष्याचं हे गुपित तुम्हाला माहितीये का?

सकाळ डिजिटल टीम

Sant Mirabai : कृष्णभक्त म्हणून जगासमोर एक नवी चेतना निर्माण करणाऱ्या संत मीराबाई यांची आज पुण्यतिथी आहे.संत मीराने श्रीकृष्णालाच सर्व मानले.कृष्णाच्या प्रेमात वेडी झालेल्या मीराचे अनेक उदाहरणे आपल्याला ऐकायला वाचायला मिळतात.

लहानपणीच आईने कान्हाच तुझा ठाकूरजी म्हणजे नवरा, स्वामी आहे अशी ओळख करून दिली अन् यालाच सत्य मानून मीरा संपुर्ण आयुष्य जगली. (Sant Mirabai death anniversary life story married life love to lord krishna read story)

मीराबाई हे फक्त एक नाव नाही तर त्या भक्ती, आस्था आणि श्रद्धा याचं उत्तम उदाहरण आहे. मीराबाईचा जन्म संवत् 1504 विक्रमी मध्ये राजा रतन सिंह यांच्या घरी झाला होता. मीरा जोधपुरच्या राठोड रतनसिंहची एकमेव मुलगी होती.

राजपूत जातिमध्ये जन्मलेल्या मीराबाईला घरातून बाहेर जाण्यासाठी परवानगी नव्हती. मात्र लहानपणी मीराबाईसोबत असं काही घडलं की त्यांनी संपूर्ण आयुष्य श्रीकृष्णाला समर्पित केले आहे.

जेव्हा मीराबाई आठ वर्षाची होती तेव्हा मोहल्ल्यातील एक वरात पाहून मीराबाईने आपल्या आईला विचारले की माझा नवरदेव कोण तर यावर तिच्या आईने मीराबाईला सांगितले होते की श्रीकृष्ण हा तुझा नवरा आहे. या घटनेनंतर मीराबाईने श्रीकृष्णलाच आपलं सर्वस्व मानलं आणि त्यांच्या भक्तीत लीन झाल्या.

ती श्रीकृष्णच्या मुर्तीला अंघोळ घालायची. नवे वस्त्र घालायची, नैवद्य द्यायची, गीत गायची आणि नृत्य करायची. किशोरवस्थामध्ये मीराने श्रीकृष्णला आपला पति मानले होते.

मीराबाईचा विवाह महाराणा सांगाचे पुत्र भोजराज यांच्याशी झाला जे समोर महाराणा कुंभा म्हणून ओळखू लागले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच मीराने तिच्या पतिला सांगितले होते की ती फक्त श्रीकृष्णाची आहे. मात्र महाराणा कुंभने मीराची ही गोष्ट हलक्यात घेतली.

पण हळूहळू श्रीकृष्णाप्रती मीराची भक्ति पाहून त्यांना विश्वास झाला की मीरा श्रीकृष्णची भक्त आहे. ती मंदिरात जाऊन नृत्य गायन करायची आणि भजन गायची. मीराच्या या वागण्यामुळे तिचे सासरचे लोक वैतागले होते.

काही काळानंतर मीराच्या पतिचा एका युद्धात मृत्यू झाला. पतिच्या मृत्युनंतर जेव्हा मीरा होण्यास सांगितले तेव्हा मीरा म्हणाली माझा नवरा श्रीकृष्ण आहे. मीरा पतिच्या मृत्यूनंतरही मंदिर जायची आणि भजन-गीत गायची आणि नृत्य करायची.

यावर मीराच्या सासरच्या लोकांनी मीरावर व्यभिचारी असल्याचा आरोप करत तिला दिलेला विषचा प्याला पिण्यास सांगितले. मीराने श्रीकृष्णचं नाव घेत विष पिले. सर्वांना वाटले की मीरा आता जीवंत राहणार नाही. मात्र श्रीकृष्णच्या कृपेने मीरावर विषचा कोणताही प्रभाव पडला नाही.

मीराचा मृत्यू कसा झाला?

सासरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिल्यानंतर सासरच्या लोकांना कंटाळून मीराने महल सोडला होता आणि अनेक ठिकाणी तीर्थासाठी गेली. अखेर मीरा वृंदावनला पोहचली. मीराने महल सोडल्याने राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या. ब्राह्मणांनी सांगितले की जर मीरा परत आली तर सर्व ठिक होणार.

मीराच्या शोधात दोन सैनिक पाठविण्यात आले. त्यांनी मीराला परत येण्याची विनंती केली मात्र मीराने नकार दिला. सैनिक म्हणाले, "जर तुम्ही आमच्यासोबत परतला नाही तर आम्ही पण परत जाणार नाही. आमच्या कुटूंबाबाबत थोडा तरी विचार करा."

मीराने सैनिकांना सांगितले की माझा तुम्ही येण्याच्या आधीच मृत्यू झाला असता तर तुम्ही रिकाम्या हाती गेला असता. त्यावर सैनिक म्हणाले, 'हो'. असं म्हणताच मीरा ने एकतारचे बाहेर काढले आणि श्रीकृष्णचे भजन गायला लागली. मीराच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रु येत होते आणि त्याच वेळी ती श्रीकृष्णच्या मुर्तीत सामावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT