Shardiya Navratri 2023 Navratri Festival Ambabai Temple Kolhapur esakal
संस्कृती

Navratri Festival : अंबाबाई मंदिर परिसरात सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत अवजड वाहनांना बंदी; 'या' मार्गांत केला मोठा बदल

नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri 2023) आज (ता. १५) पासून प्रारंभ होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शहर वाहतूक शाखेने कोल्हापूर शहरातील वाहतूक आणि पार्किंगचे नियोजन केले आहे.

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri 2023) आज (ता. १५) पासून प्रारंभ होत आहे. या उत्सवांतर्गत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने कोल्हापूर शहरातील वाहतूक आणि पार्किंगचे नियोजन केले आहे.

अवजड वाहनांना सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत शहर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.

येथेही पार्किंग :

दरम्यान, निर्माण चौक (संभाजीनगर), पंचगंगा नदी घाट, १०० फुटी रोड- खानविलकर पेट्रोल पंपजवळ येथील महापालिकेच्या प्रशस्त मैदानावर भाविकांच्या लक्झरी आणि मिनी बससाठी पार्किंग सुविधा दिलेली आहे. तसेच, बिंदू चौक पार्किंग, व्हिनस गाडी अड्डा, शिवाजी स्टेडियम, प्रायव्हेट हायस्कूल, रावणेश्वर मंदिर, पेटाळा पार्किंग, गांधी मैदान, ताराराणी हायस्कूल (मंगळवार पेठ), संध्यामठ परिसर, पंचगंगा घाट, दसरा चौक, मेन राजाराम हायस्कूल येथेही पार्किंगची सुविधा असेल. विद्यापीठ हायस्कूलसमोरील पटांगणात व्हीआयपी पार्किंग असेल.

दुचाकी वाहन पार्किंग नियोजन

पार्किंग ठिकाण मार्ग

  • एम. एल. जी. हायस्कूल - मिरजकर तिकटी ते बालगोपाल तालीम मार्गे एमएलजी

  • जेल रोड उजवी बाजू - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते भवानी मंडप

  • मेन राजाराम हायस्कूल - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते भवानी मंडप (सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत)

  • गुजरी पेठ दोन्ही बाजूस - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते भवानी मंडप

  • महाद्वार रोड - मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते बिनखांबी (सायंकाळी सहा ते रात्री दहा)

  • सीपीआर ते मराठा बँक डावी बाजू - सीपीआर सिग्नल येथून

  • करवीर पंचायत समिती कार्यालयसमोरील पटांगण - सीपीआर सिग्नल येथून

दृष्टिक्षेपात वाहतूक

  • अवजड वाहनांना सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत शहरातील प्रवेश बंदी कायम.

  • अंबाबाई मंदिर परिसरात रात्री आठनंतरही अवजड वाहनांना प्रवेश बंदी.

  • परिसरातील सर्व एकेरी मार्ग एकेरीच राहतील.

  • बिनखांबी, महाद्वार रोड ते पापाची तिकटी जाणारा एकेरी मार्ग सायंकाळी चार ते रात्री दहापर्यंत रिक्षांसाठी बंद.

  • बिनखांबी, महाद्वार ते पापाची तिकटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी वाहनांना उत्सव कालावधीत प्रवेश बंदी.

  • सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा ते माळकर चौक ते लुगडी ओळ धावणाऱ्या केएमटी बसेस या बिंदू चौक ते आईसाहेब महाराज पुतळा ते स्वयंभू गणेश मंदिर या मार्गाने मार्गस्थ होतील.

  • भवानी मंडप व घाटी दरवाजा येथील रिक्षा स्टॉप बंद राहील. येथील रिक्षांनी पर्यायी रिक्षा स्टॉपचा वापर करावा.

  • बिंदू चौकाकडून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या रिक्षांना छत्रपती शिवाजी चौकामध्ये प्रवासी उतरण्यास मनाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT