Shardiya Navratri Festival Kolhapur Ambabai Darshan
Shardiya Navratri Festival Kolhapur Ambabai Darshan esakal
संस्कृती

Ambabai Darshan : नवरात्रोत्सवातील 9 दिवसांत तब्बल 14 लाख भाविकांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन

सकाळ डिजिटल टीम

शारदीय नवरात्रोत्सवातील (Shardiya Navratri Festival) नऊ दिवसांत करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे (Ambabai Temple) तब्बल चौदा लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवातील (Shardiya Navratri Festival) नऊ दिवसांत करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे (Ambabai Temple) तब्बल चौदा लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. काल रात्री पारंपरिक उत्साहात पालखी सोहळा झाला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या उपस्थितीत पालखी पूजन झाले.

श्री अंबाबाईची श्रीदक्षिणामूर्तीरुपिणी माता रूपात पूजा बांधण्यात आली. श्रीदक्षिणामूर्ती हे भगवान शिवांचे साकार, ज्ञानस्वरूप रूप आहे. सर्व आगमशास्त्रे तंत्रविद्यांमध्ये श्रीदक्षिणामूर्ती हे आदिगुरू- संप्रदाय प्रवर्तक आहेत. त्यांच्या उपासनेने सर्व विद्या, रोग निवारण, मोक्षप्राप्ती होते.

श्रीदक्षिणामूर्ती हे वटवृक्षाखाली ध्यानमग्न असून, चतुर्भुज आहेत. श्रीदेवी माता ही आदिशक्ती असून, सर्व सृष्टी, विद्या कला- अध्यात्माची जननी आहे. ज्ञानरूपा श्रीदेवी मातेतील दक्षिणामूर्ती देवता तत्त्वाचे दर्शन घडवणारी आजची पूजा होती.

जुना राजवाडा कमानीस आज तोरण

हिल रायडर्स संस्थेतर्फे आज (मंगळवारी) दसऱ्यानिमित्त जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात येणार आहे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता होणार आहे. महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या महिला संस्थांना यावेळी रणरागिणी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आज पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर शाखेतर्फे आज (मंगळवारी) विजयादशमी पथसंचलनाचे आयोजन केले आहे. सकाळी आठ वाजता दुधाळी पॅव्हेलियन येथून या पथसंचलनाला प्रारंभ होईल. रंकाळवेस, गंगावेस, शुक्रवार गेट, जोशी गल्ली, पिवळा वाडा, जनवाडकर कॉर्नर, पंचगंगा हॉस्पिटल, शंकराचार्य मठ, दत्त मंदिर, शिंगणापूर नाका, गवत मंडई, भाविक विठोबा मंदिर, स्वरूप हॉस्पिटल ते पुन्हा दुधाळी असा संचलनाचा मार्ग राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT