Hair & Nail Cutting esakal
संस्कृती

Astro Tips : या दिवशी केस अन् नखे अजिबात कापू नये, जडतील अनेक व्याधी; जाणून घ्या कधी कापावे

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips : नखे आणि केस कापणे हा तसा तर आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. तरीही नखे आणि केस कापतांना विशिष्ट्य दिवशी कापावे असे सांगितले जाते. त्यामुळे केस आणि नखे कोणत्या दिवशी कापावे असा प्रश्न सर्वांना पडतो. शास्त्रानुसार आठवड्यातील काही दिवस असे असतात कि ज्या दिवशी आपण नखे आणि केस कापणे शुभ मानले जाते तर काही दिवशी अशुभ मानले जाते. यातून आपल्याला शुभ- अशुभ फळ प्राप्त होऊ शकते असे मानले जाते. चला तर कोणत्या दिवशी नखे आणि केस कापावे आणि कोणत्या दिवशी कापू नये हे जाणून घेऊया.

(Spiritual Astro Tips on Shubh Ashubh day for hair and nails should be cut or not)

केस अन् नखे कापण्यासाठी हे दिवस आहेत शुभ

रविवारी हा सुटीचा दिवस म्हणून बहुतांश लोक या दिवशी नखे, केस आणि दाढी कापतात. हा दिवस या कामांसाठी अत्यंत शुभ आहे. या दिवशी ही कामे केल्याने बुद्धीमत्ता यासह धनसमृद्धीची वाढ होते.

बुधवारी नखे आणि केस कापणे शुभ मानले जाते. या दिवशी हे काम केल्याने घरामध्ये देवतांसह पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. धन मिळण्याचीही शक्यता असते. त्यामुळे बुधवार हा केस आणि नखे कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे.

शुक्रवारी आपण केस आणि नखे कापू शकतो. हा दिवस देवीचा असून याला सौंदर्याचा दिवसदेखील मानला जातो. या दिवशी केस आणि नखे कापल्याने व्यक्तीला समाधान प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले जाते.

या दिवशी केस अन् नखे कापणे आहे अशुभ

सोमवारी हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. यासह हा चंद्राचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी केस आणि नख कापणे अशुभ मानल्या जाते. या दिवशी केस कापल्याने केस कापल्याने आपल्या आरोग्यवर परिणाम होतो असे मानले जाते.

मंगळवारी केस किंवा दाढी कापू नये असे सांगितले जाते. याचा थेट परिणाम व्यक्तीच्या वयावर होतो असे मानले जाते. या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचे वय कमी होते याशिवाय या दिवशी नखे कापल्याने शरीरात रक्ताशी संबंधित आजार होतात. त्यामुळे या दिवशी केस, नखे आणि दाढी कापू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.

गुरुवारी नखे आणि केस कापू नये. श्री विष्णू आणि लक्ष्मीचा हा दिवस गुरुंना समर्पित असून या दिवशी केवळ उपासना करावी असे सांगितले जाते. या दिवशी ही कामे केल्याने प्रतिष्ठेला हानी पोहचू शकते.

शनिवारी नखे आणि केस अजिबात कापू नये. या दिवशी कामे केल्याने शारीरिक व्याधी जडतात असे सांगितले जाते.

माहिती विवेचन - विजय राजेंद्र जोशी गुरुजी (ज्योतिष अभ्यासक, नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT