Spiritual Science esakal
संस्कृती

Spiritual Science : हिंदू धर्मात कानातले घालण्याला का आहे महत्व? जाणून घ्या वैज्ञानिक अध्यात्म

पुरुषांनीही कानातले घालावे असं हिंदू धर्मात मानलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

Spiritual Science About Wearing Earring In Ear : हिंदू धर्मात मुल जन्माला आल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत एकून १६ संस्कार सांगण्यात आले आहे. या प्रत्येक संस्काराच्या मागे काही अध्यात्मिक, वैज्ञानिक कारणं देण्यात आली आहेत. त्यापैकीच एक बाळाचे कान टोचणे हा आहे. मग मुलगा असो वा मुलगी हिंदू धर्मात दोघांचेही लहानपणीच कान टोचून त्यात कानातले घातले जातात.

लहानपणीच बाळाचे कान टोचले जाणे यामागे वैज्ञानिक कारण सांगण्यात येतं की, आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अॅक्युप्रेशर पॉइंट्स आहेत. त्यामुळे आपण शरीराचं संतूलन राखू शकतो. काही आजारांवर नियंत्रण आणण्याची क्षमता या पॉइंट्समध्ये असते. तसाच पॉइंट कानात असतो. जिथे कान टोचले जातात. अशाच प्रकारचं वैज्ञानिक अध्यात्म झील स्वर योगी यांनी आपल्या thecyberzeel या आपल्या इंस्टा पेजवर पोस्ट केलं आहे.

ते आपल्या या पेजवरून अध्यात्मातील अनेक वैज्ञानिक कारणं उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यातील एक पोस्ट कानातले घालण्यामागे अध्यात्म आणि विज्ञान सांगणारी आहे. ते सांगतात शरीरात इडा आणि पिंगला या नाड्या म्हणजे फेमिनाइन आणि मस्कूलाइन एनर्जी आहेत. ज्या स्त्री आणि पुरुष दोघांच्या शरीरात असतात. त्या नियंत्रीत करण्याचं केंद्र शरीरात अनेक ठिकाणी असून त्यापैकी एक कान आहे. कानातले घालणं जसं सौंदर्य वाढवणारं आहे तसंच शरीराचं संतुलन वाढवणारं आहे.

आयुर्वेदाचे जनक ऋफी सुश्रुत ज्यांनी लिहिलेल्या सुश्रुत संहिता चॅप्टर १६ मध्ये यामागचं कारण लिहून ठेवलं आहे.

महिलांना डाव्या कानात पहिल्यांदा कानातले घातले जातात मग उजव्या कारण डाव्याबाजूला फेमिनाइन आणि उजव्या बाजूला मस्कुलाइन एनर्जी असते. हा एनर्जी फ्लो टिकून रहावा म्हणून हा क्रम असतो.

पुरुषांना पहिले उजव्या मग डाव्या कानात याचं कारणही वर सांगितल्याप्रमाणे आहे. पुरुषांनी फक्त एका कानात घातलं किंवा नाही घातलं तरी चालतं.

यामागचं कारण सांगताना ते म्हणतात की, कानाचे हे छिद्र थेट महिलांनाच्या जनन यंत्रणेशी संलग्न असतात. जसे कानातले त्यांच सौंदर्य वाढवतात तसे ते त्यांच्या जनन यंत्रणेलाही सुरक्षित ठेवण्याचं काम करत असतात. तसेच डाव्या नाकात नथ किंवा नोजपीन घालण्यामागेही या एनर्जीज कंट्रोल करणं हेच कारण आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT