Spiritual Tips esakal
संस्कृती

Spiritual Tips : तुमच्या प्रत्येक कृतीचा कोणीतरी हिशेब ठेवत आहे, याचं भान ठेवा, नाहीतर...

मी देवांच्या आणि महर्षींच्या आधीचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रुती आपटे

Spiritual Tips From Bhagwat Geeta About Karmayoga :

मुलांसाठी गीता : कर्मयोगाचे आचरण

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः।

अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः।

माझा प्रभाव देव जाणत नाहीत, महर्षीसुद्धा जाणत नाहीत‌. कारण मी देवांच्या आणि महर्षींच्या आधीचा आहे.

ईश्वराच्याप्राप्तीचा राजमार्ग श्रीकृष्णाने नवव्या अध्यायात सांगितला आहे. राजमार्ग हा श्रेष्ठ मार्ग असतो. त्या मार्गावर अडथळे, खाचखळगे, खड्डे नसतात. त्यामुळे न चुकता न धडपडता वेगाने देवापर्यंत पोहोचता येते, तसेच भक्तीच्या या राजमार्गावरून कोणीही मार्गक्रमण करू शकते. स्त्री-पुरुष, बलवान-बलहीन, लहान-मोठा, ज्ञानी-अज्ञानी, सर्वजण सहज या मार्गाने जाऊ शकतात.

केवळ परमात्म्याला जाणून घेणे, त्याच्यावर भक्ती असणे आणि न थकता सातत्याने पुढे जाणे अपेक्षित असते. परमात्म्याला जाणता यावे या हेतूने भगवंत आपल्या विभूतींचे आणखी वर्णन आता करतात. श्रीकृष्ण म्हणतो, ‘‘हे महाबहू अर्जुना, तुला पुन्हा उत्तम अशी गोष्ट सांगतो. तू अगदी मनापासून माझं बोलणं ऐकत आहेस म्हणून तुझं हित व्हावं या इच्छेनं मी तुला पुन्हा सांगतो की माझी उत्पत्ती देवगणांना, महर्षींनासुद्धा कळत नाही."

"कारण मी सर्वप्रकारे त्यांचंही अदिकारण आहे. मला जन्म नाही, म्हणजेच मी अनादी आहे आणि मी भूलोकादी सर्व लोकांचा महेश्वर आहे. जो मोहरहित मनुष्य हे रहस्य जाणतो, तो पापांपासून मुक्त होऊन जातो.’’

आता मनुष्यांचे आणि प्राणिमात्रांचे विविध भाव परमात्म्यापासूनच निर्माण होतात, त्याविषयी श्रीकृष्ण विस्ताराने सांगतात. भाव म्हणजे बुद्धीच्या भिन्न भिन्न अवस्था, स्थिती किंवा वृत्ती. बुद्धी म्हणजे आकलन शक्ती, ज्ञान म्हणजे विवेकज्ञान. क्षमाशीलता, खरे बोलणे, दम म्हणजेच इंद्रियाचे दमन करणे, शम म्हणजे शांती, तसेच सुख, दुःख, उद्‍भव आणि अभाव, अहिंसा, समता, तुष्टी, अहिंसा, समता, संतुष्टी, दान, यश इत्यादी भाव मनुष्य प्राण्यांमध्ये असतात; ते सर्व माझ्यापासूनच निर्माण होतात.

अशा प्रकारे माझ्या विभूती, म्हणजेच माझे विस्तारित स्वरूप तसेच हे सर्व निर्माण करण्यासाठी माझ्याकडे असलेला अलौकिक योग सामर्थ्य जो तत्त्वतः जाणतो तो अविचलपणे कर्मयोगाचे आचरण करू शकतो, याच संशय नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT