Swasthyam 2023 Bhagavad Gita Mahabharat Kurukshetra War
Swasthyam 2023 Bhagavad Gita Mahabharat Kurukshetra War  sakal
संस्कृती

Swasthyam 2023 : धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे

सकाळ वृत्तसेवा

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।

मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय।

बालमित्रांनो, कुरुक्षेत्र एक विस्तीर्ण पसरलेलं समतल क्षेत्र. या रणभूमीवर कौरव आणि पांडव यांच्या विशाल सेना एकमेकांच्या समोर शत्रू म्हणून उभ्या होत्या. युद्धाची घोषणा होईपर्यंत युद्धाला सुरुवात होणार नव्हती, कारण ते धर्मयुद्ध होतं, युद्धाचे नियम ठरलेले होते. ते सर्वजण काटेकोरपणे पाळणार होते.

रणभूमीवर हत्ती, घोडे, रथ, पदाती अशी चतुरंग सेना होती. कौरवांचे वडील धृतराष्ट्र अंध होते. संजय नावाच्या दूताकडून ते युद्धभूमीवर काय घडतंय, हे ऐकण्यासाठी उत्सुक होते. धृतराष्ट्राने संजयला प्रश्न विचारला, की धर्मक्षेत्र असलेल्या या कुरुक्षेत्रावर एकत्रित आलेले माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केलं ते तू मला सांग.

संजय सांगू लागले, ‘‘दुर्योधनानं द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन त्यांना पांडवांच्या बाजूनं कोण लढणार आहे आणि आपल्या, म्हणजेच कौरवांच्या बाजूनं कोण लढणार आहे, ते वर्णन करून सांगितले आहे. सेनापती भीष्माचार्य यांचं सर्व बाजूंनी तुम्ही सगळ्यांनी संरक्षण करा, अशी सूचना त्यांनी द्रोणाचार्यांना केली.

युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत हे दाखवण्याकरता सर्व योध्यांनी आपापले शंख वाजवले, विविध रणवाद्यं निनादू लागली. नंतर पांढरे स्वच्छ घोडे जोडलेल्या विशाल रथावर आरूढ झालेल्या अर्जुन आणि श्रीकृष्ण यांनीही दिव्य शंख वाजवले. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होता. आणि आता युद्धाला सुरुवात करायची अशा तयारीनं हातात धनुष्य उचलून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, ‘‘हे हृषीकेशा, माझा रथ दोन्ही सेनांच्या मध्ये घेऊन चल. या युद्धामध्ये कोणाकोणाशी लढायचे आहे ते मला पाहू दे.

अत्यंत दुष्ट बुद्धीनं आम्हाला युद्धास प्रवृत्त करणाऱ्या दुर्योधनाच्या बाजूनं कोण कोण लढणार आहे, ते मी पाहतो.’’ शत्रुसेनेमध्ये उपस्थित असलेले आपलेच मित्र, नातेवाइकांना पाहून अर्जुनाच्या मनात कोणते विचार आले, ते आपण उद्याच्या भागात बघूया...

- श्रुती आपटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT