Tulasi Vivah
Tulasi Vivah esakal
संस्कृती

Tulsi Vivah 2022: तुलसी विवाहासाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य कोणकोणते आहे?

सकाळ डिजिटल टीम

आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतान प्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो. या सर्वांची व्यवस्थित जाणीव व्हावी अशा हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला.

हिंदू धर्मात तुलसी विवाह विशेष महत्त्व आहे. यावर्षी पाच नोव्हेंबर 2022 पासून तुलसी विवाहाच्या मुहूर्त सुरुवात होत आहे. असे मानले जाते की, भगवान विष्णूचा अवतार असलेल्या शालिग्राम जिचा विवाह माता तुळशीची विधीवत विवाह करतात. आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते. तुलसी विवाह दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे साहित्याचा वापर केला जातो. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्याच साहित्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

सुरूवातीला बघू या तुलसी विवाहसाठी लागणारी साहित्यची यादी पुढीलप्रमाणे: 

1)भगवान शालिग्राम

2) तुळशीचे रोप

3) ऊस

4) मुळा

5) कलश

6) नारळ

7) कापूर

8) आवळा

9) हरबरा भाजी

10) गंगाजल

11) पेरू

12) दिवा

13) धूप

14) फुलं

15) चंदन

16) वस्रमाळ

17) सिंदूर

18) लाल ओढणी

19) हळद कुंकू

20) कपडे,

● आता बघू या नववधू साठीआवश्यक असणाऱ्या गोष्टी : 

1) मेहंदी

2) बांगड्या

3) साडी

4) टिकली इत्यादी

तुलसी विवाह दरम्यान कोणत्या मंत्राचा जप करावा?

तुलसी विवाह दरम्यान, देवाची आराधना करण्यासाठी ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा.

तुलसी विवाहाचे महत्ववैवाहिक जीवनात अधिक गोडवा वाढवण्यासाठी आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी तुळशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो. शास्त्रानुसार, जर एखाद्याच्या लग्नात अडचणी येत असतील किंवा लग्नामध्ये गोडवा नसेल तर तुलसी विवाहाच्या दिवशी तुम्ही मनोभावे देवाची आराधना केल्यास तुमच्या आयुष्यातील या समस्या दूर होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT