Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : घरात पैसा टिकत नाही? 'या' दिशेला ठेवा तिजोरीचे तोंड

वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानातील तिजोरी योग्य दिशेला ठेवावी, यामुळे धनाची देवी लक्ष्मीची कृपा होते.

सकाळ डिजिटल टीम

घरोघरी पैशाची चणचण हा विषय फार कॉमन असला तरी प्रत्येकासाठी तेवढाच चिंतेचा असतो. पैशाने सर्वकाही विकत घेता येत नसले तर पैशांशिवाय जगणेही शक्य नसते. त्यामुळे जीवनात आनंद मिळवण्याच्या मुख्य घटकांपैकी पैसा हा महत्त्वाचा घटक आहे. पैसे मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. पण, घरात नेहमी पैशाची कमतरता असते. यामागे वास्तुदोष असू शकतात.

अनेकदा लोक पैसे ठेवण्यासाठी घरात आणि दुकानात तिजोरी वापरतात. मात्र, तिजोरी ठेवताना ती कुठे ठेवायची याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे वास्तुदोषांना सामोरे जावे लागते आणि पैसे मिळण्यात अडचणी येतात.

योग्य दिशा महत्त्वाची

वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानातील तिजोरी योग्य दिशेला ठेवावी, यामुळे धनाची देवी लक्ष्मीची कृपा होते आणि धन कमाईचे सर्व दरवाजे खुले होतात. तिजोरीला चुकीच्या दिशेने ठेवल्याने संपत्ती येत नाही, त्यामुळे नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा शास्त्रात सांगितली आहे. त्यामुळे त्यानुसार तिजोरी ठेवणे शुभ आहे.

तिजोरी या दिशेला ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य कोनात ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते. या दिशेला तिजोरी ठेवल्याने पैसा जास्त काळ टिकत नाही.

तिजोरी या दिशेला ठेवा

वास्तुशास्त्रानुसार तिजोरी घरात अशा खोलीत ठेवावी, ज्याला एकच दरवाजा असेल. दोन प्रवेशद्वार असलेल्या खोलीत तिजोरी ठेवणे अशुभ मानले जाते. दरवाजाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला उघडावे. तिजोरी दक्षिण भिंतीकडे ठेवल्यास ती एक इंच पुढे असावी. तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT