vastu tips esakal
संस्कृती

Vastu Tips : या 5 वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक तंगीपासून मिळेल सुटका

या वस्तू ठेवल्याने प्रत्येक कामात यश मिळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते

सकाळ वृत्तसेवा

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेले वास्तुदोष दूर करण्यासाठी काही वस्तू ठेवल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू घरी आणाव्यात.

पांढर्‍या आकचे (रुई) रोप

घरामध्ये पांढर्‍या आकचे रोप लावणे शुभ मानले जाते. या वनस्पतीमध्ये गणेशाचा वास असून तो शिवाला अत्यंत प्रिय आहे. घरामध्ये हे रोप लावल्याने सुख-समृद्धीसोबत आर्थिक स्थिती मजबूत होते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. आग्नेय दिशे शिवाय उत्तर दिशेला ही वनस्पती लावणे शुभ असते.

नारळ

वास्तुशास्त्रानुसार घरात एक डोळा असलेला नारळ ठेवणे शुभ मानले जाते. हा नारळ सुख-शांतीचे प्रतीक मानले जाते. एक डोळा असलेला नारळ आणून त्यावर सिंदूर लावून लाल रंगाच्या कपड्यात बांधून पूजेच्या खोलीत ठेवावा आणि नित्य पूजा करावी.

शालिग्राम

शालिग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. या कारणास्तव हे घरामध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरामध्ये शालिग्रामची नित्य पूजा केली जाते त्या घरामध्ये वास्तुदोषांसह इतर बाधा दूर होतात.

पारद शिवलिंग

घरातील वास्तुदोष दूर करण्यासोबतच घरामध्ये सुख-समृद्धी येण्यासाठी पारद शिवलिंग घरात आणावे. या शिवलिंगाची रोज पूजा केल्यास भगवान शंकराची कृपा प्राप्त होते.

हरिद्रापासून बनवलेला गणपती

हरिद्रा ही एक प्रकारची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या मुळाशी गणपतीचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे घर किंवा ऑफिसमध्ये हरिद्रापासून बनवलेला गणपती ठेवल्यास वास्तुदोष दूर होतो आणि धनप्राप्ती होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT