Vasu Baras 2022 Esakal
संस्कृती

Vasu Baras 2022: यंदा कधी आहे वसुबारस?

वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी

सकाळ डिजिटल टीम

अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. मात्र, देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते, असे मानले जाते.

कधी आहे वसुबारस?

यंदा वसुबारस 21 ऑक्टोबर 2022 शुक्रवारी आहे. 

वसुबारसेच्या दिवशी आजही संध्याकाळी गावोगावी शेतकऱ्यांची लहान लेकरं "दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी ” गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या ” हे गाणं हातात सुरसुंदरी घेऊन म्हणतात.

वसुबारस साजरी करण्यामागची आख्यायिका काय आहे?

जेव्हा असुरांमध्ये आणि देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्र मंथन करण्यात आले. त्या वेळी समुद्र मंथन करत असतांना त्यातून 5 रत्ने बाहेर पडली आणि ह्या रत्नातून पाच गायी बाहेर पडल्या आणि त्यातील एका गायी चे नाव नंदिनी होते . तिचे प्रतीक म्हणून गोबारस साजरी करण्याची प्रथा आहे. आणि दुसरं म्हणजे गाई पासून आपल्याला खूप सारे फायदे देखील मिळतात . गायीचे तूप , दूध, दही, ताक तसेच , गाईचे पवित्र आणि गुणकारी गोमूत्र आणि गाईचे शेण हे देखील निसर्गाची देणगीच आहे.

शेतातील उत्पन्न वाढवण्यासाठी आपण गायी चे शेणखत देखील वापरतो . अश्या बऱ्याच प्रकारचे गायी चे आपल्यावर उपकार असतात . तर त्या बद्दल गायीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हि वसुबारस साजरी करतो.

वसुबारसेची पूजा कशी करतात?

वसुबारस दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात -

तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |

मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||

हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात त्या व्रताला बछवाँछ असे म्हणतात. 

घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT