Som Pradosh Vrat Esakal
संस्कृती

Som Pradosh Vrat : सोमप्रदोष व्रत म्हणजे नेमक काय ?

प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष कालात पूजेची वेळ वेगळी असते. तसे, सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या आधीच्या वेळेला प्रदोष काल असे म्हणतात.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्व आहे. दर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो. प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. हिंदू धर्मांप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो, म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत आल्यास याचं महत्त्वचं अजूनच वाढतं.

सोम प्रदोष पूजा विधी कसा करावा ?

प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते. सूर्यास्तापासून 45 मिनिटाआधी व सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतर पर्यंतचा काळ प्रदोष काळ मानला जातो. प्रदोष व्रतात महादेवाचं अभिषेक करुन बिल्व पत्र अर्पित करावे. शिव मंत्रांनी जप करावं. जप केल्यानंतर प्रदोष व्रत कथा ऐकावी. नंतर आरती करुन कुटुंबात प्रसाद वितरित करावा.नंतर मग महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्

काय आहे प्रदोष काळाची आख्यायिका ?

पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्यायले. हे विष इतके प्रभावी होते की ते प्यायल्यानंतर महादेवाचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली. तेव्हा देवांनी महादेवाचा मत्सर जल, बेलपत्र इत्यादींनी कमी केला. महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते, त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणी झाले. ही घटना घडली ती वेळ त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणूनच या दिवसाला विषेश महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT