थोडक्यात:
गुरूपौर्णिमा हा सण महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो, जे वेदांचे विभाजन करणारे ऋषी होते.
या दिवशी गुरूंचा सन्मान, त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांची पूजा करणे ही परंपरा आहे.
वेदव्यास यांनी घोर तपश्चर्येनंतर वेद, पुराणे आणि महाभारत यांची रचना केली, म्हणून त्यांना आद्य गुरू मानले जाते.
Why do We Celebrate Guru Purnima: संपूर्ण भारतात गुरूपौर्णिमेला विशेष असे महत्व आहे. गुरूपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. गुरूपौर्णिमेला ‘आषाढ पौर्णिमा’ आणि ‘व्यास पौर्णिमा’ म्हणून ही ओळखले जाते. यंदाची गुरूपौर्णिमा ही १० जुलै २०२५ ला साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये गुरूला देवासमान दर्जा देण्यात आला आहे.
या शुभ दिनी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरूंची मनोभावे पूजा केली जाते. गुरूपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे. कारण, याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यामुळे, हा दिवस गुरूच्या प्रती सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. ही गुरूपौर्णिमा का साजरी केली जाते? आणि त्यामागील पौराणिक कथा काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात.
महर्षी वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यामुळे, वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरूपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस गुरूपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे. ही परंपरा आजतागायत पाळली जात आहे. महर्षी वेदव्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवद्गीतेसह एकूण १८ पुराणांची रचना केली होती.
गुरूपौर्णिमेची पौराणिक कथा अशी की, आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. असे म्हटले जाते की, वेदव्यास यांनी बालपणीच त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
परंतु, त्यांची आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली. मग, वेदव्यास हट्टीपणा करू लागले, त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला. तसेच, जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल, तेव्हाच परत या, असे ही सांगितले. त्यानंतर, वेदव्यास यांनी घनदाट अरण्यात घोर तपश्चर्या केली.
त्यांच्या या घोर तपश्चर्येमुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले. यानंतरच, त्यांनी ४ वेदांचा विस्तार केला. तसेच, महाभारतासह, ब्रह्मसूत्र आणि १८ महापुराणांची रचना केली. महर्षी वेदव्यास यांना चारही वेदांचे ज्ञान होते. त्यामुळेच, या दिवशी गुरूची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे.
गुरूपौर्णिमा कोणत्या दिवशी साजरी केली जाते? (When is Guru Purnima celebrated?)
– गुरूपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला, यंदा १० जुलै २०२५ रोजी साजरी केली जाईल.
गुरूपौर्णिमा कोणासाठी समर्पित आहे? (To whom is Guru Purnima dedicated?)
– गुरूपौर्णिमा महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे, म्हणून तिला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.
महर्षी वेदव्यास यांचे कार्य काय होते? (What was the contribution of Maharshi Ved Vyasa?)
– त्यांनी चारही वेदांचे विभागीकरण, १८ पुराणे, महाभारत आणि ब्रह्मसूत्रांची रचना केली.
गुरूपौर्णिमा का साजरी केली जाते? (Why is Guru Purnima celebrated?)
– गुरुंप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.