1200 gifts received by pm narendra modi to be auctioned on 17th september for namami ganga project  esakal
देश

PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव; 'येथे' वापरले जाणार पैसे

सकाळ डिजिटल टीम

खेळाडू आणि राजकारण्यांसह विविध लोकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून देण्यात आलेल्या 1200 हून अधिक वस्तूंचा लिलाव होणार आहे. पीएम मोदींना मिळालेल्या भेटवस्तूमध्ये अनेक मौल्यवान वस्तू आहेत ज्यांचा 17 सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे. लिलावासाठी ठेवल्या जाणार्‍या वस्तूंची किंमत 100 ते 10 लाख रुपयांपर्यंत असेल. तसेच या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम नमामि गंगे मिशनसाठी वापरली जाणार आहे.

भेटवस्तूंमध्ये मिळालेल्या वस्तूंबद्दल बोलायचे झाले तर, या वस्तूंच्या यादीमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली राणी कमलापतीची मूर्ती, हनुमानाची मूर्ती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिलेले सूर्य पेंटींग यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिलेल्या त्रिशूळाचाही देखील यामध्ये समावेश आहे.

महालक्ष्मीच्या मूर्तीचाही समावेश

भेटवस्तूंमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापुरात असलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीचाही समावेश होता, जी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भेट दिली होती, तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी भिंतीवर टांगता येणारे भगवान व्यंकटेश्वराचे चित्र भेट दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या बहुमोल भेटवस्तूंचा लिलाव होण्याची ही चौथी वेळ आहे. हा लिलाव फक्त ऑनलाइन असणार आहे.

भेटवस्तूंमध्ये आणखी काय असेल?

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे संचालक टेमसुनारो जमीर म्हणाले की, पदक विजेत्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट, बॉक्सिंग ग्लोव्हज, भाला आणि रॅकेट यांसारख्या क्रीडा वस्तूंचा एक विशेष संग्रह देखील आहे. यासोबतच पेंटींग्ज, शिल्पे आणि हस्तकला आणि लोककलाकृतींचाही समावेश आहे. यासोबतच इतर संस्मरणीय वस्तूंमध्ये अयोध्येतील श्री राम मंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराचे मॉडेल यांचा देखील समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT