LG-Delhi 
देश

दिल्ली उपराज्यपालांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; १३ जण पॉजिटिव्ह

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला असून एकूण १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जगभरात थैमान घालत असलेल्या जीवघेण्या कोरोनाने आता उपराज्यापालांच्या कार्यालयातही धडक दिली आहे. आज (ता. ०२) मंगळवारी सकाळी ही माहिती समोर आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊनमधून काहीशी सूट दिल्यानंतर दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. एकीकडे दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना महत्त्वाच्या सरकारी कार्यालांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. जवळपास सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतर सरकारने देशातील व्यवहार हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र निर्बंध शिथील होऊ लागल्यावर देशातील कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहेत.

दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत सोमवारी चार दिवसानंतर एक हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्या अगोदर २८ ते ३१ मे दरम्यान सलग हजार पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची दिल्लीत नोंद झाली होती. तर १ जून रोजी ९९० रुग्ण आढळले होते. दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या २० हजार ८३४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५२३ झाली आहे. दिल्लीतील आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या दिल्लीत कोरोनाचे ११ हजार ५६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पैकी २ हजार ७४८ रुग्ण हे कोविड रुग्णालयात दाखल आहेत. यामधील २१९ रुग्ण आयसीयूमध्ये तर ४२ जण व्हेंटिंलेटरवर आहेत.

भारत नक्कीच आत्मनिर्भर बनेल; हा आहे नवा फॉर्म्युला :  पंतप्रधान मोदी 

देशातील कोरोनाचे रुग्ण सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक संख्येने वाढले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ८ हजार१७१ रुग्णांची नोंद झाल्याने, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या दहा देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडय़ापूर्वी भारत नवव्या क्रमांकावर होता. मात्र आता देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT