crime esakal
देश

Instagram वरची मैत्री पडली महागात, चालत्या कारमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात एका 13 वर्षीय मुलीवर कारमध्ये बलात्कार

धनश्री ओतारी

चालत्या कारमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार आसाममध्ये घडला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. (13 Year Girl Allegedly Gang Raped In Moving Car In Assam 4 Arrested )

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात ही घटना मंगळवारी घडली असून सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अनवर हुसैन आणि मोमिनुर रहमान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Marathi Tajya Batmya)

हे सर्वजण 19-24 वयोगटातील असून मूळचे धुबरी जिल्ह्यातील आहेत. रुबेल आणि इम्रान हे शालेय विद्यार्थी आहेत, तर मोमिनूर हा चालक म्हणून काम करतो. अनवर काही करत नाही.

वरिष्ठ पोलिस अधिकारी नूर इस्लाम सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मंगळवारी दुपारी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने एक कार अडवली आणि चौकशीदरम्यान संशयास्पद दिसल्यानंतर तरुण आणि तरुणीला पोलिस ठाण्यात आणले.' त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (Marathi Tajya Batmya)

१३ वर्षीय तरुणीची रुबेलशी ओळख होती. ती मुलगी रुबेलच्या काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आली होती. घटनेच्या दिवशी तो तरुण तिच्या मित्रांसह धुबरीहून तिला भेटायला आला आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे," असे अधिकारी म्हणाले.(Marathi Tajya Batmya)

आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीदेखील पोलिस अधिकाऱ्याने यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMFBY: एल निनोचा इशारा! अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ; शेतकऱ्यांना लाखोंची नुकसानभरपाई देतो हा विमा

IPL 2027 Trade Update: महेंद्रसिंग धोनी CSK चा नवा प्रशिक्षक? स्टीफन फ्लेमिंगबाबत नवे अपडेट्स, हार्दिक पांड्या...

Oracle Layoffs : AI ने हिसकावली रोजी रोटी ! ओरॅकलने २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, भविष्यातही नोकऱ्यांवर येणार गंडांतर

Nagpur: चिखलातून वाहने चालविण्यासाठी व्हा सज्ज!; पावसाळा तोंडावर अन् रस्त्यांची चाळण; वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

Latur News: लातूर जिल्ह्यास मोठा दिलासा; अहमदपूर-उदगीर रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी, ३०० कोटी मंजूर, आ. संजय बनसोडेंच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT